

नाशिक - जिल्ह्यावर सूर्य कोपला असून, एप्रिलच्या मध्यातच पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. त्यामुळे वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत असताना ग्रामीण भागात टंचाईच्या झळा वाढू लागल्या. अर्ध्याधिक जिल्ह्यातील १४९ गावे- वाड्यांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात ५२ टँकरद्वारे ८७ हजार ३०४ लोकसंख्येची तहान भागविली जाते.