Nashik Water Scarcity : भर पावसाळ्यात 60 टँकरने पाणीपुरवठा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होणार

police supply water tanker
police supply water tanker

Nashik Water Scarcity : पावसाळ्याच्या ऑगस्टमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या तब्बल ६० टँकरच्या १४२ फेऱ्या सुरू असून, टंचाईच्या तोंडावर जिल्हाभरात ४२ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.

दरम्यान, स्थिती अशीच राहिल्यास जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. (Water supply by tankers is going on in August due to no rainfall nashik news)

यंदा जिल्ह्यात भीषण टंचाईचे सावट दिसत आहे. पावसाळा संपत आला; पण अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत जेमतेम निम्माच पाऊस झाला आहे. धरण साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे.

त्यात गंगापूर-दारणा धरण समूहातून ऑक्टोबरमध्ये नगर आणि मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाण्याचे आवर्तन सोडावे लागणार असल्याने जिल्ह्यात नोव्हेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

police supply water tanker
Nashik Water Scarcity : भर पावसाळ्यात पाणीबाणी...! ऑगस्ट उजाडला तरी 16 टँकर सुरू

टँकरवरच भवितव्य

बागलाण तालुक्यात ३, चांदवड ९, देवळा ४, मालेगाव १२, नांदगाव ११, सिन्नर २, येवला १६ याप्रमाणे जिल्ह्यातील ७५ गावे आणि ६२ वाड्या अशा १३७ ठिकाणी ६० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आतापर्यंत १७ विहिरी, तर गावातील नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी २५ याप्रमाणे ४२ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.

सर्व तालुक्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. १५ ऑक्टोबर दिवस गृहीत धरून त्यानुसार पाण्याचे नियोजन केले जाते. त्या वेळी नगर आणि मराठवड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागते. त्यामुळे गंगापूर समूहातील पाणी कमी होऊन शहरासह ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

police supply water tanker
Nashik Water Scarcity : 24 दिवसांपासून पाऊस 53 महसूल मंडळातून गायब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com