सिडको- अंबडगाव येथील स्मशानभूमीमध्ये पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन तुटलेली असून, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.