अमरावती विभागाइतके टँकर एकट्या नाशिक जिल्ह्यात सुरू

Water Tanker
Water Tankeresakal

नाशिक : मॉन्सूनच्या (Monsoon) आगमनाची महाराष्ट्राला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. नेमक्या अशा परिस्थितीत राज्यातील जनतेच्या घशाची कोरड वाढत चालली आहे. ५७२ गावे आणि १ हजार २८२ वाड्यांसाठी ४८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ४५ ने टँकर (Water Tanker) वाढले असून गेल्यावर्षीपेक्षा ५० टँकर अधिक सुरु आहेत. अकोला जिल्ह्याचा अपवाद वगळता अमरावती विभागातील ८४ गावांसाठी ८२ टँकर धावताहेत, तर जवळपास तेवढ्या म्हणजे, ८१ टँकरद्वारे एकट्या नाशिक जिल्ह्यातील ९० गावे आणि १५४ वाड्यांसाठी पाणीपुरवठा (Water supply) सुरु आहे. (water supply through water tankers in Nashik District Nashik News)

राज्यात जूनमध्ये सर्वसाधारणपणे ५५.४ मिलिमीटर पाऊस होतो. आतापर्यंत सर्वसाधारणच्या तुलनेत १०.८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वसाधारणच्या तुलनेत ७९.१ टक्के पावसाची नोंद झाली होती. विभागनिहाय आतापर्यंत जूनच्या सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्यावर्षीच्या जूनमधील पावसाची टक्केवारी दर्शवते) : कोकण-४.६ (४२.६), नाशिक-५.१ (१०७.४), पुणे-२९.८ (११२.७), औरंगाबाद-१४.६ (१३८.५), अमरावती-४.८ (५४.८), नागपूर-२.२ (४३.८). सध्या गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील ३ हजार २६७ धरणांमध्ये २.९६ टक्के अधिक म्हणजेच, २५.६९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोठ्या १४१ प्रकल्पांमध्ये २९.२१, मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये २३.८६, लघू २ हजार ८६८ प्रकल्पांमध्ये ११.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

मनरेगा कामावर अडीच लाख कार्यरत
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जलसंधारण, पारंपारिक जलस्रोत बळकटीकरण, टंचाई निवारण, लघू सिंचन अशा ९ हजार ५९९ कामांवर आता राज्यात २ लाख ४५ हजार ६५२ जण कार्यरत आहेत. दरम्यान, राज्यात विभागनिहाय टंचाई जाणवत असलेल्या गावे आणि वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात टंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दर्शवते) : कोकण-२०३-६२२ (११४), नाशिक-१३९-२८३ (११८), पुणे-७७-३४० (७९), औरंगाबाद- ६४-३७ (८७), नागपूर-५-० (५).

सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरु नाही. गेल्यावर्षीच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्गमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता, तर धुळे, नंदूरबार, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात टँकर सुरु नव्हता. २०१९ मध्ये दुष्काळी स्थिती टिपेला पोचलेली असताना जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक १ हजार १६९ टँकरद्वारे औरंगाबाद जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्याखालोखाल बीडमध्ये ९७४, नगरमध्ये ८५३, जालनामध्ये ६९६, नाशिकमध्ये ३८८, सोलापूरमध्ये ३५१, पुण्यात ३०६, बुलडाणामध्ये २९७, सातारामध्ये २९४, उस्मानाबादमध्ये २३५, जळगावमध्ये २१० टँकर सुरु होते.

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची स्थिती
तारीख गावांची संख्या वाड्यांची संख्या टँकरची संख्या
७ जून २०२१ ५८० ९२१ ४३७
८ जून २०२० ९२९ १ हजार ७७८ ८४६
१५ जून २०१९ ५ हजार ५०६ ११ हजार ७५५ ६ हजार ९०५
१८ जून २०१८ १ हजार ७९७ १ हजार ५३३ १ हजार ८०१
१२ जून २०१७ १ हजार ७९८ ४ हजार २८१ १ हजार ६६६

धरणांमधील जलसाठा उपलब्धता
(आकडेवारी टक्केवारीमध्ये)
विभागाचे नाव प्रकल्प संख्या आजचा साठा गेल्यावर्षीचा साठा
अमरावती ४४६ ३३.०६ २५.७६
औरंगाबाद ९६४ २८.३४ २३.४५
कोकण १७६ ३७.२२ २७.१३
नागपूर ३८४ २७.८४ २६.९८
नाशिक ५७१ २२.९९ २०.७५
पुणे ७२६ २५.६९ २२.७३

Water Tanker
Nashik : 450 कोटींच्‍या कामांवर आयुक्‍तांनी मारली फुली

'शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातील ८० ते १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यावर पेरणी योग्य पाऊस झाल्याचा अंदाज घ्यावा. मगच पेरणी करावी. त्याअगोदर पेरणी करू नये. पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने पावसाचा अंदाज घेऊन पेरणी नियोजन करावे. तसेच बियाणांची खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. बियाणांचा वापर करताना पिशवी उलट्या बाजूकडून फाडावी. त्यातील १० ते १५ ग्रॅम बियाणे, टॅग, पिशवी जपून ठेवावी. घरगुती बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी."
- विवेक सोनवणे, प्रभारी, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक

Water Tanker
आठवडे बाजारात टोमॅटो, कोथिंबीर @ ८०; सर्वच भाज्यांच्या दरांत तेजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com