Nashik : 450 कोटींच्‍या कामांवर आयुक्‍तांनी मारली फुली

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
Nashik Municipal Commissioner Ramesh Pawaresakal

नाशिक : महापालिकेच्‍या (NMC) आर्थिक स्‍थितीचा विचार करता प्रशासक तथा महापालिका आयुक्‍त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांच्‍याकडून अनावश्‍यक कामांना फुली मारली जाते आहे. खर्चाचा अतिरिक्‍त फुगवटा या माध्यमातून कमी केला जातो आहे. एकट्या बांधकाम विभागातील (Construction Department) सुमारे साडेचारशे कोटींची कामे थांबविली आहेत. (Commissioner rejects Rs 450 crore works Nashik News)

काम थांबविलेल्‍या बांधकाम विभागातील सुमारे चारशे कोटींची भांडवली, तर सुमारे पन्नास कोटी रुपयांची महसूली कामे असल्‍याचे सांगितले जात आहे. दरम्‍यान, भूसंपादनासाठी आठशे कोटींचा खर्च झालेला असल्‍याने याचा परिणाम इतर कामांना होत असल्‍याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर इतर मंजूर कामेदेखील थांबविण्यात येत आहेत. या निर्णयामुळे अनेक प्रभागातील कामे ठप्प झालेली असल्‍याने संबंधित भागातील माजी नगरसेवकांकडून नाराजीचा सूर व्‍यक्‍त होतो आहे. थांबविलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने मायको सर्कल उड्डाणपुलाचा समावेश आहे. याआधीच आयुक्तांनी पंधरा कोटी खर्चाच्‍या चोपडा लॉन्‍स परीसरातील पुलाचे काम थांबविले होते.

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
Nashik : अचानक उसाला लागल्याने शेतकऱ्याचे झाले आर्थिक नुकसान

आधीच दोन पूल असताना तिसऱ्या पुलाची आवश्‍यकता नसल्‍याच्‍या नागरिकांच्या तक्रारीनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. आवश्‍यक कामे होतील, परंतु अनावश्‍यक कामे थांबविण्यात येतील, असे श्री. पवार यांनी पदभार स्‍वीकारल्‍यानंतरच स्‍पष्ट केले होते. पुन्‍हा एकदा आयुक्‍त श्री. पवार यांनी आढावा घेताना कामांना कात्री लावली आहे. मंजुरी असलेल्‍या, परंतु कामाला सुरवात न झालेल्‍या अशा कामांची माहिती आयुक्‍तांकडून मागविली जाते आहे.

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
Malgegaon : महापालिकेवर 13 जूनपासून आयुक्तांची प्रशासकपदी नियुक्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com