मालेगाव कॅम्प- कसमादे परिसरात युवा शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतात पालेभाज्या मिरची, वांगे, शेवगा, टोमॅटो, ड्रॅगन फूट, टरबूज या पिकांची लागवड करून भरघोस उत्पादन काढत आहेत. फळपिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसत आहे.