Nashik Weather Forecast : जिल्ह्याच्या काही भागात रविवारी पाऊस अथवा गारपिटीची शक्यता! | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Weather Update

Weather Forecast : जिल्ह्याच्या काही भागात रविवारी पाऊस अथवा गारपिटीची शक्यता!

Nashik News: अवकाळी पाऊस, गारपीट या हवामानात काहीसा बदल होतो न होतो तोच जिल्ह्यातील काही भागात रविवारी (ता. २६) विजांच्या कडकडासह जोरदार वारे वाहत हलका ते मध्यम पाऊस अथवा गारपीट होण्याची शक्यता आहे. (Weather Forecast Chance of rain or hail in some parts of district on Sunday nashik news)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच बुधवारपासून (ता. २२) रविवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सुरवातीचे पाच दिवस आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. (Latest Marathi News)

कमाल तापमान ३० ते ३४ आणि किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वाऱ्याचा वेग तासाला ८ ते १४ किलोमीटर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Latest Nashik News)

टॅग्स :Nashikrainweather forcast