Nashik Rain Breaks Goda Ghat Submerged as Gangapur Dam Discharges Water
Sakal
नाशिक: सलग तीन दिवसांच्या संततधारेनंतर नाशिक शहर व परिसरात रविवारी (ता. ७) सायंकाळनंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र गंगापूर धरणातून विसर्ग वाढविल्याने गोदाघाट पाण्याखाली गेला आहे. उर्वरित जिल्ह्यात दिवसभरात हलक्या सरी बरसल्या. हवामान विभागाने गुरुवार (ता. ११)पर्यंत जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे.