Wedding Ceremony : लग्नाचा खर्च केला शिक्षण संस्थेला दान; या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding Ceremony

Wedding Ceremony : लग्नाचा खर्च केला शिक्षण संस्थेला दान; या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा

Wedding Expenses Donation to an Educational Institution : लग्न म्हटलं की संपुर्ण कुटुंबात आनंदाच वातावरण संचारत. प्रत्येक कुटुंबीयाला या मंगलकार्यात आनंद उत्साहात धमाल करायची असते. वधु- वरांना देखील आयुष्यातील या नव्या इनिंगची सुरुवात करताना मोठी हौस मौज करायची इच्छा असते. आणि असे केलेही जाते. मात्र नाशिकमधील एका कुटुंबाने या सर्व गोष्टींना फाटा देत समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात या विवाहाची चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा: Nashik News : गोरज मुहूर्तांवरील लग्न वाहतुकीला डोकेदुखी; रस्त्यालगत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर

विद्यार्थ्यांना होणार या निधीचा उपयोग

मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सरचिटणीस निधीची घोषणा केली होती त्यांच्या प्रतिसादाला साथ देत समाजातील शिक्षणाचे महत्त्व डोळ्यासमोर ठेवत स्वतः शिक्षकी पेशात असणाऱ्या जामदार व जगताप कुटुंबीय यांनी संस्थेला आर्थिक मदत केली. सदर निधीची भर पडल्याने शैक्षणिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना या निधीचा उपयोग होणार आहे.

हेही वाचा: Nashik News : हेडगेवारनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रंगतात रात्रीच्या ओल्या पार्ट्या!

मविप्र संस्थेच्या सेवक सोसायटीमध्ये कार्यरत असणारे शिवाजी महादू जामदार यांनी आपले चिरंजीव विशाल याचा विवाह साधेपणाने करीत 51 हजार रुपये रकमेचा धनादेश रविवार (ता. 18) रोजी लग्न सोहळ्याप्रसंगी मविप्र संस्थेला दिला. यावेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी प्रा.अशोक पिंगळे,जामदार कुटुंबीय व जगताप कुटुंबीय उपस्थित होते. जामदार यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन ॲड नितीन ठाकरे यांनी यावेळी केले.