अडीचलाखात बायको आणली लग्नानंतर पळून गेली

अडीचलाखात बायको आणली लग्नानंतर पळून गेली
Published on: 
NSK26H32028 व NSK26H32027 पारोळा : सुमन सहाणी व आरती पटेल. ------------ जेवणात विष देऊन पतीसह तिघांना मारण्याचा प्रयत्न ---------- लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता फरारी; धुळ्यापर्यंत पाठलाग करीत दोन तरुणी ताब्यात; मध्यस्थ एजंटचा शोध सुरू सकाळ वृत्तसेवा पारोळा/जळगाव, ता. ११ : वेल्हाणे (ता. पारोळा) येथे लग्नानंतर नवविवाहितेने जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन पतीसह तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पारोळा पोलिसांनी संशयित तरुणींना धुळ्यातील निमगूळपर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. विशेष म्हणजे लग्नासाठी एजंटच्या माध्यमातून अडीच लाख रुपये देऊन परप्रांतातून या मुली आणण्यात आल्या होत्या. वेल्हाणे येथील वाल्मीक ताराचंद पाटील (वय ३२) यांचा विवाह ७ ऑक्टोबरला संशयित सुमन सुभाष सहाणी हिच्यासोबत झाला. या विवाहासाठी झारखंड किंवा छत्तीसगड येथून दोन महिलांना मध्यस्थामार्फत आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहाच्या व्यवहारात अडीच लाख रुपयांची बोली ठरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या व्यवहाराची व संबंधित एजंटची भूमिका पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. जेवणातून दिले विष शुक्रवारी (ता. ९) जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन फिर्यादी गणेश ताराचंद पाटील (वय ३४), त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील व आई सरलाबाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित महिला पैसे घेऊन निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. विषबाधेमुळे त्रस्त झालेल्या फिर्यादीच्या आईवडिलांना सध्या जळगावच्या जिल्‍हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुळ्यापर्यंत पाठलाग घटनेची माहिती वेल्हाणे येथील पोलिसपाटलांनी पारोळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिस नाईक सुनील हाटकर यांना घटनास्थळी रवाना केले. तपासात दोन्ही तरुणी धुळेच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग करून निमगूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटरवर दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन सुभाष सहाणी व आरती सूर्यप्रकाश पटेल अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. एजंटचा शोध सुरू विवाहासाठी महिलांना आणणाऱ्या मध्यस्थ एजंटचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का?, याचाही तपास केला जात आहे. या घटनेतील सर्व बाबींचा तपास सुरू आहे. तपासात इतर सर्व बाबींचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com