Wedding Season: लग्नसराईने कष्टकऱ्यांच्या बरकतीला बळ! हाराच्या निर्मितीतून मिळतोय अनेक महिलांना रोजगार

wedding season
wedding seasonesakal

Wedding Season : लग्नसराईमुळे कष्टकऱ्यांच्या हाताला काम उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या संसाराला हातभार लाभत आहे.

लग्नसमारंभासह अन्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी फुलांच्या हारांना मोठी मागणी असल्याने पंचवटीतील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. (Wedding Season strengthens prosperity of hardworking Many women getting employment from Flower necklace making nashik news)

कधीकाळी सराफ बाजारात भरणारा फूल बाजार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने गणेशवाडीत स्थलांतरित झाल्यावर अनेक फूल विक्रेत्यांनी त्याला विरोध दर्शविला होता.

कालौघात हा फूल बाजार येथे चांगलाच बहरला असून त्याद्वारे कोरोनात रोजगार गमावलेल्या अनेकांना रोजगार प्राप्त झाला आहे. भल्या पहाटे सुरू होणाऱ्या या बाजारातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होते.

सण, उत्सव, लग्नसराईच्या काळात तर ही उलाढाल दुप्पट होत असल्याने विक्रेते सांगतात. गणेशवाडी परिसरात माळी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. त्यामुळे परिसरातील अनेक घरांचे अर्थकारण फुलांच्या व्यवसायावरच अवलंबून आहे.

औरंगाबाद रोडसह पंचवटीत मोठ्या संख्येने लॉन्स व मंगल कार्यालये उभी राहिली आहे. याठिकाणी वर्षभर लग्नकार्यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे फुलांसह तयार हारांची मोठी मागणी असते.

अनेक फूल व्यावसायिक येथील कष्टकरी महिलांना फुले व दोरा पुरवून हार बनविण्याचे काम देतात. या कामामुळे कोरोनात रोजगार गमावलेल्या अनेक कुटुंबांना नव्याने रोजगार उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

wedding season
Post wedding shoot : प्री-वेडिंग पडलं मागे! शहरात पोस्ट वेडिंग शुटचा नवा ‘ट्रेंड'; लोकेशन्स बुक

विशेष म्हणजे हार तयार झाल्यावर सायंकाळी लगेच पैसेही उपलब्ध होत असल्याने अनेक महिला नव्याने यात समाविष्ट होत आहेत. झेंडू, गुलछडी, बिजली, अस्टर या फुलांच्या माळांना ग्राहकांची अधिक पसंती असते.

पाच फूट लांबीचा हार ओवण्यासाठी दहा रुपये मजुरी मिळते. ही मजुरी फुलांच्या प्रकाराप्रमाणे व हार बनविण्याच्या पद्धतीनुसार ठरत असते. याद्वारे एका महिलेला दोनशे ते तीनशे रुपयांचा रोजगार उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या संसाराला हातभार लागत आहे. यात ज्येष्ठ महिलांप्रमाणेच तरुणींचाही मोठा सहभाग आहे.

बंगाली महिलांनाही रोजगार

पंचवटी परिसरातील गणेशवाडी भागात सोन्याचे दागिणे बनवून देणाऱ्या बंगाली कारागिरांची मोठी संख्या आहे. हे लोक कुटुंबासह या भागात वास्तव्यास आहेत.

पुरुष मंडळी कामानिमित्त सराफ बाजारात गेल्यावर या महिलांनाही आता फुलांच्या हारावाटे चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी सराफ बाजार बंद असल्याने अनेक बंगाली कारागीरही फुलांच्या माळा तयार करत आहेत.

wedding season
Wedding Season : चाळीसगावातील मंगल कार्यालये हाऊसफुल्ल...! व्यावसायिकांना सुगीचे दिवस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com