Weekend Trip: वीकेंड ट्रिपची पिंपळगाव परिसरात क्रेझ! तरुणाईकडून आखले जाताहेत लाँग ड्राइव्हचे प्लॅन

Long Drive Monsoon
Long Drive Monsoonesakal

Weekend Trip : नाशिक जिल्ह्यात गडकोट असलेल्या इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाळी वातावरणातील थंड हवा, रिमझिम पाऊस, गरमागरम वाफाळलेला चहा, फेसाळलेली कॉफी, पकोडे-भजी यांचा आस्वाद घेत निसर्गाच्या सान्निध्यात टु-व्हीलर, फोर व्हीलरमधून लाँग ड्राइव्हचे वीकेंड प्लॅन आखले जात आहेत.

वीकेंड ट्रीपची पिंपळगाव परिसरात क्रेझ वाढली आहे. मित्रमंडळी व परिवारासह सफरीचे आयोजन केले जात आहे. यामुळे आदिवासी भागातील अर्थकारणाला चालना मिळत आहे. (Weekend trip craze in Pimpalgaon area Long drive plans made by youth nashik)

पावसाळा सुरू झाला, की गडकिल्ल्यावर ट्रेंकिंगचा ट्रेंड काही वर्षापासून पिंपळगाव शहरात रुजत आहे. यंदा यात मोठी वाढ झाली आहे. ट्रिपच्या आयोजनात तरुणाई अग्रेसर असून, शंभर किलोमीटर त्रिजेच्या परिघातील नयनरम्य निसर्गस्थळांना भेट देण्यासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे.

पिंपळगाव शहरात आर्थिक समद्धी असली तरी निसर्गाचे लेण असलेल्या डोंगर, झाडींचा मात्र अभाव आहे. त्यामुळे येथील नागरिकांना निसर्गाचा हा ठेवा आकर्षित करत असून नागरिक शनिवार, रविवार तसे नियोजन करीत आहे. किल्ल्यांना दुर्गप्रेमी जात आहे.

डोंगर-किल्ल्यांचे वरदान असलेल्या भागात चांगला पाऊस सुरू असल्याने उंच कड्यांवर कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक तयारीला लागले आहेत.

घाटातील नागमोड्या वळणावर हिरवी झालर पांघरलेली दरी व त्या पलीकडे असलेल्या डोंगरावर पसरलेली धुक्याची दाट झालर पाहतांना मन प्रसन्न होत आहे.

अशा वेळी स्मार्टफोनच्या किंवा कॅमेऱ्याच्या भिंगातून पाहात क्लित करून कोणाला या आठवणी साठवून ठेवाव्या वाटणार नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Long Drive Monsoon
Monsoon Tourism: काय तो वणीचा डोंगर, काय ते धबधबे, काय ती झाडी! गडावरील निसर्गसौंदर्याची तरुणाईला भुरळ

पिंपळगावचे अनेक पर्यटक कुटुंबासह किंवा तरुणाई आपल्या मित्रांच्या ग्रुपसमवेत या अशा ट्रिपचे आयोजन करत आहेत. शनिवार, रविवार सुटी व त्याला जोडून एखादी सुटी घेऊन अनेक चाकरमाने पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद घेत आहे.

धम्माल मस्तीसाठी प्लॅन ठरलेला

दीड महिन्यापूर्वीच पावसाळी वीकेंड ट्रिपचा प्लॅन अनेकांनी करून ठेवला होता. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने त्यंचा हिरमोड झाला.

आता दाटून आलेले ढग...काळवंडलेले आकाश अन रिमझिम बरसणारा पाऊस, असे वातावरण पाहुन प्रत्येकाच्या मानात भटकंती करायची अन् पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्याची लगबग दिसत आहे.

धबधब्यात ओलेंचिंब होण्याचा आनंद घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. आठवडाभरापासून कोसळत असलेल्या पावसामुळे काही दिवसांपूर्वी केलेले पावसाळी पर्यटनाचे प्लॅन आता प्रत्यक्षात येत आहेत. पालकांनी ठरविलेल्या सहलीत आबालवृद्ध उत्साहाने सहभागी होत आहेत.

Long Drive Monsoon
Monsoon Tourism: शहरात पर्यटकांची मांदियाळी..! बसस्‍थानकावर गर्दी, धार्मिक-निसर्ग पर्यटनाला चालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com