Nashik News : मनमाड शहराची आर्थिक उलाढाल मंदावली; अर्थव्यवस्थेवर परिणाम

manmad weekly market
manmad weekly marketesakal

Nashik News : ग्रामीण भागात वाढलेली दुकानदारी, ठिकठिकाणी भरत चाललेले आठवडे बाजार, सुलभ दळणवळण, दुचाकींची वाढलेली संख्या या सर्वांच्या परिणामामुळे मनमाड शहराच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील उलाढाल बऱ्याच प्रमाणात मंदावली आहे. (weekly Market turnover slowed down to a great extent in manmad nashik news)

परिसरातील खेड्यातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम इथल्या आर्थिक उलाढालीवर झाला आहे. त्यामुळे भरगच्च भरणाऱ्या बाजाराचे स्वरूप कमी झाले आहे.

मनमाड शहर नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव तालुक्यांच्या सीमेवर वसले असल्यामुळे येथे दर रविवारी भरणारा आठवडे बाजारात मोठी रेलचेल असायची. परंतु कोरोनाकाळात बंद झालेला बाजार पूर्ववत सुरू झाला पण त्याला आता पूर्वीसारखे स्वरूप राहिले नाही.

कोरोनापूर्वी शहरात जमधाडे चौकापासून ते थेट कृष्णा हॉटेलपर्यंत आठवडे बाजाराचा रस्ता ते नदीवरील पूल तसेच गवळी सुभाष रोड पासून ते थेट भाग्यलक्ष्मी बँकेपर्यंत बाजार भरगच्च भरायचा.

मात्र कोरोना मुळे बाजार बंद झाला. नंतर कोरोना गेल्यानंतर बाजार सुरू झाला असला तरी त्याला पूर्वीसारखे स्वरूप राहिले नाही. परिसरातील गावामधील ग्रामस्थांचा राबताच कमी झाला. केवळ शेतमाल विकण्यासाठी गावातील लोक शहरात येत आहे. शहरातील नागरिकच बाजारात दिसत असल्याने याचा परिणाम येथील अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

manmad weekly market
Nashik News : वैतरणा धरणात तरुणाचा बुडून मृत्यू

खेड्यातील मिळू लागले सर्वकाही

पूर्वी खेड्यात एक दोन दुकान सोडले तर काहीच मिळत नव्हते. त्यामुळे खेड्यातील लोकांना शहराच्या बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे मनमाड शहरातील बाजारपेठ आठवड्याच्या बाजाराच्या रविवारच्या दिवशी भरलेली असायची. नागरिकांची मोठी वर्दळ असायची. मात्र कालांतराने यात बदल होत गेला.

आता मनमाड शहराच्या परिसरातील सर्वच खेडेगावात सर्व वस्तूंची दुकाने झाली. कपडे, सोने, फर्निचर, दुग्धजन्य पदार्थ, जनरल स्टोअर्स, दवाखाने, मेडिकल, खते, कीटकनाशके, हॉटेल, अशा वेगवगळ्या प्रकारची दुकाने झाल्यामुळे पाहिजे ती वस्तू गावातच मिळू लागल्यामुळे शहराकडे येण्याची गरज राहिली नाही. इतकेच नाही तर अनेक खेडेगावात

गावांमध्ये वेगवेगळ्या वारी हे आठवडे बाजार भरवले जातात. त्यामुळे फळे, भाजीपाला, किराणा सामान, स्टेशनरी, कटलरी, चप्पल, कपडे, बेकरी पदार्थ, खाद्यपदार्थ आदींची खरेदी विक्री होऊन मोठी उलाढाल होत असते. सर्वच काही बाजारात उपलब्ध झाल्यामुळे खेड्यातील ग्रामस्थांचा शहराकडे येण्याचा कल कमी झाला आहे.

manmad weekly market
Fraud Doctors : आदिवासी भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; आरोग्य विभागाचे सोईस्कर दुर्लक्ष

शहराची अर्थव्यवस्था मंदावली आहे....

मनमाड शहरातील अर्थव्यवस्था ही परिसरातील खेडेगावातील ग्रामस्थ आणि मनमाड शहरातील नागरिकांवर अवलंबून होती. येथे दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात शहरातील नागरिकांसह परिसरातील माणसे मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे मनमाड शहरात मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेची उलाढाल होत होती.

येथील छोट्या मोठ्या व्यावसायिक, विक्रेते यांचा या बाजारपेठेवर अर्थकारण चालायचे. मात्र सध्या बाजारात माणसांची वर्दळ कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम येथील अर्थव्यवस्थेवर झाला. जमधाडे चौक ते कृष्णा हॉटेल पर्यंत भरणारा बाजार नेहरू भवन पासून सुरू अवघ्या काही अंतरावर तुरळक झाला आहे.

सुभाष रोड पासून गांधी पुतळ्या पर्यंत तुरळक बाजार असतो. परिसरातील माणसे शहरात येण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम बाजारातील उलाढाल मंदावली आणि त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. शहराचे अर्थकारण काहीअंशी ठप्प झाले आहे.

manmad weekly market
Nashik News : धारगाव आरोग्यकेंद्र असून नसल्यासारखे; आदिवासी भागातील रूग्णांची गैरसोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com