Nashik News : नववर्षाचे स्वागत गांजा लागवडीने

देशात कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव निम्म्याहून कमी झाले आहेत.
ganja tree
ganja treeesakal

Nashik News : देशात कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव निम्म्याहून कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भावाने कांद्याची विक्री सुरु आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून ‘निसर्ग पिकवून देत नाही, तर सरकार विकू देत नाही’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. (Welcoming New Year with ganja Cultivation by farmers nashik news)

अस्मानी-सुलतानी संकटाच्या मालिकेमुळे शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र कोलमडून पडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने गांजा लागवड करीत नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाची ओळख आहे. परंतु, सरकारच्या निर्णयामुळे शेती व्यवसायाची माती झाली आहे. वर्षानुवर्षे शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिढ्या अंकुरण्याआधी मातीत गाडल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस, गारपीट, रोगट हवामान, यासह वीज वितरणाचा अनागोंदी कारभार, शेतमालाच्या हमीभावाचे गाजर, बाजार समित्यांमध्ये होणारी लूट, रासायनिक खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती आदी समस्यांमुळे शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कांदा बाजारातून गायब झाला अथवा न परवडण्याइतका महाग झाला, की महागाईच्या नावाने गळा काढला जातो. परंतु, कांदा उत्पादकांना कधीतरी चांगला भाव मिळतो. मात्र, अनेकदा उत्पादन खर्च निघत नसल्याने कमी भावात कांदा विकण्याखेरीज दुसरा पर्याय शेतकऱ्यांपुढे उरत नाही.

ganja tree
Nashik News : हत्या, गोळीबार, पोलिसांच्या बदल्या अन्‌ राजकारण

मागणीच्या तुलनेत कांद्याचे पीक कमी अथवा अधिक आल्यामुळे हा चढ-उतार सुरु असतो. हे समजून घेतले नाही, अशी तक्रार शेतकरी संघटनेची आहे. कांद्याचे भाव वाढताच यंदा केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये कांद्याचे निर्यातमूल्य ८०० डॉलरपर्यंत वाढवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

दिवाळीनंतर कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने सुमारे चार हजार रुपये क्विटंल भावाने विकला जाणारा कांदा दीड ते दोन हजार रुपये भावाने विकला जात आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाबद्दल कांदा उत्पादकांमध्ये नाराजी आहे. त्याविरोधात कांदा उत्पादकांनी रस्त्यावर उतरत आपली नाराजी आळवली.

''नैसर्गिक आपत्ती व शेतमालाचे भाव पाडण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकार असंवेदनशील आहे. कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने मातीमोल भावाने विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी द्याने गावातील आपल्या शेतात एक जानेवारीला गांजाची लागवड करणार आहे.''-शैलेंद्र कापडणीस, जिल्हा उपाध्यक्ष, शेतकरी संघटना

ganja tree
Nashik News : जिल्ह्यात 3 तालुक्यांना मिळेना गटविकास अधिकारी; प्रशासनाची सुरू आहे कसरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com