
देवळा (जि. नाशिक) : विठेवाडी (ता. देवळा) येथील रावसाहेब संपत निकम यांची विहीर अतिवृष्टीने कोसळल्याने या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असला तरी याबाबत अद्याप कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने संबंधित शेतकरी कुटुंब हवालदिल आहे. याबाबत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Well at Vithewadi damaged by flood nashik Latest Marathi News)
मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आले. गिरणा नदीला आलेल्या महापुरात नदीकाठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने त्याचा फटका उभ्या पिकांना बसला, तसेच नदीकाठावरील विहिरींचे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामे केले; परंतु अद्यापपर्यंत नुकसानभरपाई एक रुपयाही मिळाला नसल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे दुसऱ्यांदा नुकसान झाले. गिरणा नदीला आलेल्या महापुरात विठेवाडी शिवारातील नदीकाठच्या जमिनीवर असलेल्या विहिरी पूरपाण्यात खचल्या. काही विहिरी बुडाल्या, तर काही आरसीसी बांधकाम केलेल्या विहिरींच्या रिंगा तुटून त्या खचल्या.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने विठ़ेवाडी शिवारातील माजी सरपंच रावसाहेब संपत निकम यांच्या शेतातील पूरपाणी घुसून संपूर्ण विहीर खचली. ७० ते ७५ फूट खोल असलेली आणि बांधलेली संपूर्ण विहीर तुटून दबली गेली. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले; परंतु शासनाने अद्यापपर्यंत काही भरपाई दिलेली नाही. महसूल विभागाने तत्काळ वरिष्ठ पातळीवर पहाणी करावी व नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
"मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीच्या काठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे शेतीचे, उभ्या पिकांचे, तसेच विहिरींचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामेही केले; परंतु अद्यापपर्यंत नुकसानभरपाई दिली नाही. ती तत्काळ देण्यात यावी. "-कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.