
भक्ष्य न मिळाल्याने जेव्हा कोब्राने गिळला दुसरा कोब्रा; हिंगणवाडीतला थरार
नांदगाव : सापाने एखादा साप गिळल्याचे अपवादाने ऐकू येते. अर्थात, कोब्रा (Cobra) दुसऱ्या प्रजातीच्या सर्पाला गिळत असल्याचे दृश्य जंगलात अधूनमधून दिसते. मात्र, कोब्राच जेव्हा भक्ष्य न मिळाल्यास चक्क आपल्याच प्रजातीतल्या दुसऱ्या एखाद्या कोब्राला गिळतानाचा प्रकार तसा दुर्मिळच. मात्र, हा अनुभव हिंगणवाडीतल्या टाइल्स कारखान्यात (Tiles factory) काम करणाऱ्या मजुरांना अनुभवयास मिळाला. (When the cobra swallowed another cobra due to lack of food Thrill in Hinganwadi Nashik News)
हेही वाचा: Jalgaon : जिल्हा बँकेच्या ATM मध्ये खडखडाट
त्याचे झाले असे, दुपारच्या रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या मजुरांचे नेहमीप्रमाणे टाइल्स भरण्याचे काम सुरु होते. एकामागे एक टाइल्स उचलत असताना एका ठिकाणी फुत्कार ऐकू आल्याने या मजुरांची भंबेरी उडाली. कारण, त्याठिकाणी चक्क चार फुट लांबीचा कोब्रा ठाण मांडून बसलेला होता. सध्या उन्हाची तीव्रता व असह्य करणारी काहिली यामुळे सावलीसाठी व भक्ष्याच्या शोधात हा कोब्रा आला असावा. या ठिकाणी वेल्डिंगचे काम चालू होते. वेल्डर मोहन शिलावट, पप्पू देवरे, दीपक नन्नावरे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांच्याशी संपर्क केला. बडोदे हे पोहचले तेव्हा हा चार फुटाचा कोब्रा स्वसंरक्षणार्थ सारखे फुत्कार काढत होता. सर्पमित्र बडोदे यांनी कोब्रा बाहेर काढताच त्याने गिळलेला दुसरा अडीच फुटाचा कोब्रा मृतावस्थेत बाहेर पडला. हा थरार बघून उपस्थितांची भंबेरी उडाली. कारण यापूर्वी असे कधीही बघावायास मिळालेले नव्हते.
हेही वाचा: Jalgaon : महामार्गालगत विस्तारली; अतिक्रमणाची ‘बाजारपेठ’
Web Title: When The Cobra Swallowed Another Cobra Due To Lack Of Food Thrill In Hinganwadi Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..