Jalgaon : जिल्हा बँकेच्या ATM मध्ये खडखडाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JDCC bank

Jalgaon : जिल्हा बँकेच्या ATM मध्ये खडखडाट

जळगाव : बोदवड तालुक्यात जिल्हा बँकेचे एकही एटीएम मशिन चार दिवसांपासून सुरू नाही. अनेक वेळा पैसे काढले तर नोटा फाटक्या असतात. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये (Nationalised Bank) अनेक सुविधा शेतकऱ्यांना मिळतात. शेतकऱ्यांचा विमा राष्ट्रीयीकृत बँकाच काढतात. सुविधाही देतात. मात्र जिल्हा बँकेत नाही, अशा तक्रारी खरीपपूर्व हंगाम बैठकीत करण्यात आल्या. दरम्यान, खरीपपूर्व हंगाम बैठकीत भाजपचे (BJP) खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार गिरीश महाजन, इतर आमदार गैरहजर होते. तर शिवसेनेचे (Shiv sena) आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादीचे (NCP) अनिल पाटीलही गैरहजर होते. (Rumble in District Bank ATM Nashik News)

पालकमंत्र्यांना भ्रमणध्वनी

पालकमंत्री पाटील म्हणाले, की जेडीसीसीच्या एटीएममधून पैसे काढल्यास शेतकऱ्यांचे जादा १७ रूपये कापले जातात. शेतकरी मला फोन करतात. ते कसले पैसे कट होतात. बोदवडला एटीएम बंद असते. जिल्हा बँकेने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पैसे काढताना त्रास होणार नाही, विनाकारण पैसे कपात होणार नाही, याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास मागे आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज द्यावे, असेही सांगितले.

हेही वाचा: Raj Thackeray : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षांना अटक

२४०० कोटींचे खरीप कर्ज

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी खरिपाचे नियोजन सादर केले. राष्ट्रीयीकृत बँकामार्फत १७०२ कोटी ६५ लाख कर्ज वाटपाचे नियोजन आहे. यापैकी ६७ लाख रुपयांचे वाटप झाले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत ७५२ कोटी रुपयांच्या कर्ज देण्याचे नियोजन आहे. यापैकी २७२ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात २७ लाख ५० हजार पाकिटे कपाशी बियाण्यांचे नियेाजन आहे. यात वितरकांकडे १० मेपर्यंत बियाणे येणार असून, १ जून २०२२ नंतर हे बियाणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. १ लाख ३३ हजार ४८२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. शिवाय ११ हजार ६८२ मेट्रीक टन खतांचा बफर स्टॉक आहे.

हेही वाचा: Cyber Crime : अश्‍लिल चित्रफित प्रसारित करणाऱ्यास 3 लाख रुपये दंड

केळी संशोधन केंद्र रावेरला करा

केळी संशोधन केंद्र जळगावला आहे. केळी उत्पादक रावेर, यावल तालुक्यात आहेत. यामुळे हे केंद्र किंवा उपकेंद्र रावेरला सुरू करण्याची मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी कृषी विभागाला प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की शेतीतील नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पोकरा योजनेत सहभागी व्हावे. स्वतःच्या मालाचे स्वतः मार्केटिंग करावे व ते विकावे.

Web Title: Rumble In District Bank Atm Jalgaon District Bank News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top