लासलगाव- कोरोनाच्या काळात बंद झालेल्या देवगिरी, जनता आणि शालिमार एक्स्प्रेसच्या थांब्याचे अद्याप पुनर्स्थापना न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या तीन एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे बंद केल्यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. ‘रेल्वे प्रशासन झोपेत आहे का’ असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.