
शासकीय सेवेत काम करत असताना रुग्णवाहिका चालक व वाहनचालकांना नियमबाह्य पद्धतीने शव वाहून नेण्याचे आदेश काही अधिकारी देत आहेत.
नाशिक : शासकीय रुग्णवाहिकेतून (Ambulance) नियमबाह्य पद्धतीने शव वाहून नेण्याचे काम लादले जात असल्याच्या चालकांच्या तक्रारी (Complaints)आहे. कोर्टाच्या आदेशाविरुद्ध मनमानी पद्धतीने शववाहतूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने, आयटक संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन (Statement) देण्यात आले आहे. (While working in the government service some officials are ordering ambulance drivers and drivers to carry the bodies in an illegal manner)
शासकीय सेवेत काम करत असताना रुग्णवाहिका चालक व वाहनचालकांना नियमबाह्य पद्धतीने शव वाहून नेण्याचे आदेश काही अधिकारी देत आहेत. हे नियमबाह्य असून शासकीय रुग्णालय प्रशासन नियम पुस्तिका खंड एक रुग्णवाहिका सेवा मुद्दा क्रमांक सातनुसार सांसर्गिक रोगांचे रुग्ण वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका व रुग्णवाहिका चालक यांच्याकडून करू नये, असे स्पष्ट उल्लेख आहेत. ‘शववाहिका चालक’ हे पद जाणूनबुजून वर्षानुवर्षे रिक्त ठेवले.
संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये तर हे पद उपलब्धच नसल्याची धक्कादायक बाब संघटनेच्या निदर्शनास आली आहे . कार्यरत असलेल्या वाहनचालकांकडून बळजबरीने शव वाहण्याचे प्रकार सुरू आहेत. जे मानवी आरोग्य व अधिकारांचे उल्लघंन आहे. रुग्णवाहिका चालकास शववाहिका चालवावयास सांगितल्याने रुग्णसेवा बाधित होऊ शकते, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू देसले, सचिव ॲड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, गजानन खंदारे, अमोल सरोदे, किरण पंडित आदींनी दिला आहे.(While working in the government service, some officials are ordering ambulance drivers and drivers to carry the bodies in an illegal manner)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.