Nashik News: नांदगावला सापडला पांढऱ्या तोंडाचा कोब्रा; सर्पमित्र विजय बडोदेंनी केला ‘रेस्क्यू'

White mouth cobra and snake friend Vijay Barode while rescuing cobra
White mouth cobra and snake friend Vijay Barode while rescuing cobra

Nashik News: दहेगाव चौफुली येथील बाळकाका कलंत्री काट्यासमोर दशरथ शिंदे यांचे चहाचे हॉटेल असून हॉटेलच्या मागे शेती आहे. हॉटेलच्या मागून एक पांढऱ्या तोंडाचा साप दगडामध्ये जाताना श्री. शिंदे यांना दिसला.

त्यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. श्री. बडोदे घटनास्थळी पोचले आणि दगड हालवले असता, त्यांना एक वेगळ्या प्रकारचा नाग लपल्याचे आढळले. त्यांनी कोब्राला ‘रेस्क्यू' केले. (white faced cobra was found in Nandgaon nashik news)

नागाची लांबी जवळपास चार फूट होती. नागाच्या तोंडाकडचा भाग फाटलेला असून तोंड पूर्णपणे पांढरे पडले होते. कदाचित, मुंगूस व नागामध्ये द्वंद्व झाले असावे आणि नाग मुंगसाच्या तावडीतून सुटलेला असावा. नागाच्या तोंडाला जखम झाली होती.

अशा प्रकारचा नाग पहिल्यांदाच सापडल्याने त्याची माहिती मिळवण्यासाठी श्री. बडोदे यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना या नागाचे छायाचित्र पाठवले. राहुल शिंदे यांनी छायाचित्राचे निरीक्षण केले आणि मुंगसाने नागाचे तोंड फाडल्याचा अंदाज असून त्यामुळे नागाची शिकार करण्याची क्षमता कमी झाली असावी असा अंदाज वर्तवला.

White mouth cobra and snake friend Vijay Barode while rescuing cobra
Nashik News: तासाभरात वाळणार 50 क्विंटल मका! सुमंगलचा उत्तर महाराष्ट्रातील पहिला मका ड्रायर प्रकल्प कार्यान्वित

अशक्तपणामुळे नागाला योग्य प्रमाणात पोषण मिळाले नसावे आणि त्याच्या शरीरातील ‘मेलनीन'चे प्रमाण कमी होऊन त्याच्या त्वचेचा मूळ रंग जाऊन त्याठिकाणी पांढरा रंग येत आहे अथवा पूर्वीपासूनच ‘लुसिस्टिक' म्हणजे पांढरा असावा आणि त्याच्या शरीराला आलेल्या पांढऱ्या रंगामुळे तो मुंगसाच्या नजरेस सहजरीत्या पडला असावा.

त्यातून तो मुंगसाकडून जखमी झाला असावा. त्याच्या शरीरावर आलेल्या पांढऱ्या रंगामुळे हा ‘लुसिस्टिक' होत असून या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत ‘ल्युसिझम' म्हणतात. ‘ल्युसिझम' म्हणजे रंगद्रव्य हस्तांतरणातील दोषामुळे ‘मेलेनीन'चे आंशिक अथवा पूर्ण नुकसान झाल्याने रंगद्रव्य कमी होते.

त्वचा रंगहीन होते अथवा तिथे पांढरा रंग येतो. नागाचा संपूर्ण तोंडाचा भाग पांढरा पडला असून शरीराच्या काही भागांवरील खवले पांढरे झाले आहेत, असे राहुल शिंदे यांनी सांगितले. श्री. बडोदे यांनी नागास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेऊन उपचार केले आणि नांदगाव वनविभागात नोंद करून नागास तत्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

White mouth cobra and snake friend Vijay Barode while rescuing cobra
Nashik News: दलित वस्ती सुधारचा निधी 18 कोटींनी घटला; जिल्हा प्रशासनाच्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com