नाशिकचा आगामी पालकमंत्री कोण?

Jaykumar Raval & Girish Mahajan
Jaykumar Raval & Girish Mahajanesakal

नाशिक : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Sarkar) गडगडले. त्यामुळे आता राज्यात नव्याने भाजप (BJP) व शिवसेनेचे (Shiv Sena) सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाचे वाटप व त्यानंतर पालकमंत्री पदाचे वाटप होईल. त्यामुळे नाशिकचा आगामी पालकमंत्री गिरीश महाजन की जयकुमार रावल, या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Who is next Guardian Minister of Nashik Nashik News)

Jaykumar Raval & Girish Mahajan
नाशिक तालुका हद्दीत पोलिस शिपायाचा धुडगूस

भाजप सरकार असताना तत्कालीन जलसंधारण मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते. महाजन यांच्या कार्यकाळामध्ये पक्षाची व्यवस्थितपणे बांधणी झाली होती. नाशिक महापालिकेसह नगरपालिका व जिल्हा परिषदेमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. मात्र, २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाजन यांचा नाशिकशी कनेक्ट तुटला. त्यानंतर माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे नाशिकचा कार्यभार देण्यात आला. आता राज्य पुन्हा भाजप व सेनेची सत्ता येत असताना नाशिकच्या पालकमंत्री पदावर कोण विराजमान होणार याबाबतदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करता पक्ष बांधणी तसेच सत्ता आणण्यासाठी नेतृत्वाची आवश्यकता राहणार आहे त्यामुळे नाशिकवर पकड मजबूत करण्यासाठी पालकमंत्री पददेखील भाजपकडे येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच गिरीश महाजन की जयकुमार रावल पालकमंत्री होणार, याकडेदेखील नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Jaykumar Raval & Girish Mahajan
नाशिक जिल्ह्यात ५४ कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com