मका पिकांत रानडुक्करांचा धुमाकूळ; अर्धा एकर क्षेत्र उध्वस्त

मका पिकांत रानडुक्करांचा धुमाकूळ; अर्धा एकर क्षेत्र उध्वस्त
मका पिकांत रानडुक्करांचा धुमाकूळ; अर्धा एकर क्षेत्र उध्वस्त
Updated on

विराणे (जि. नाशिक) : विराणे (ता. मालेगांव) येथील शेतकरी श्याम बाळू पगार यांच्या शेतातील मका पिकावर रानडुक्करांनी हल्ला चढवित पिकांत धुमाकूळ घालत मक्याची कणसे फस्त केली. ऐन काढणीला आलेल्या मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात परिसरात विहिरींना पाणी नसते. शाम पगार यांना आपल्या अडीच एकर जमिनींपैकी अर्धा एकर मका लावलेला होता. विहिरीत दोन भावांचा वाटा असल्याने आठ दिवसांत चार ते पाचच वाफे भरत मका पिक वाढविले होते. परंतु रात्री रानडुक्करांनी सर्वच मका पिकाची कणसे फस्त केली. गावातील गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने गावातील लोकांनी हळहळ व्यक्त करत नुकसानभरपाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

मका पिकांत रानडुक्करांचा धुमाकूळ; अर्धा एकर क्षेत्र उध्वस्त
'महिला' डॉक्‍टरांना संघटनेत नेतृत्‍वाची संधी

काटवन परिसरात चिंचवे, विराणे, पोहाणे, लुल्ले, रामपुरा गावांदरम्यान हजारो हेक्टर जंगल आहे. यात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. त्यातील रानडुक्करांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ते नेहमीच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पिकांवर हल्ला चढवितात. अनेक वेळा पेरलेले दाणे सुद्धा उकरून फस्त करतात. रानडुक्करे नेहमीच टोळी करून फिरत असतात. फळबागा, भूईमूग, भाजीपाला, मका अशा पिकांत रानडुक्कर नेहमीच घुसतात व नुकसान करतात. जंगली रानडुकरे ही मोठाली आहेत. माणसांवर देखील गुरगुरतात. वनविभागाचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांकडे पुर्णतः दुर्लक्ष आहे. आधीच महागडी बियाणे, मजूरी, खते, फवारणी, वाहतूक, पेरणी खर्च, अस्मानी संकटे याला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता रानडुक्करांनी देखील हतबल केले आहे.

मका पिकांत रानडुक्करांचा धुमाकूळ; अर्धा एकर क्षेत्र उध्वस्त
डॉक्‍टरांवरील हल्ल्‍यांविरोधात 'कायदा'

''विहिरीला पाणी कमी असताना मोठ्या कसरतीने मका वाढविला होता. आठ दिवसांनी मका काढायचा देखील होता. परंतु रानडुकरांनी हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी.'' - श्याम पगार, नुकसानग्रस्त शेतकरी, विराणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com