
माळेगाव : माळेगाव कारखाना निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीची उत्सूकता शिगेला पोचली आहे. अर्ज माघारी घेण्याचा उद्या गुरूवारी (ता.१२) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माळेगावच्या निवडणूक रिंगणात पवार कायम राहतात, की माघात घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.