Nashik News | जिल्हात शाळा पूर्णवेळ राहणार सुरू? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 शाळा

नाशिक जिल्हात शाळा पूर्णवेळ राहणार सुरू?

नाशिक : कोरोना महामारीच्‍या काळात शिक्षण क्षेत्र प्रभावित झालेले आहे. अशात आता शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एप्रिलमध्येही शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केलेला होता. या संदर्भात पालकांमध्ये दुमत असल्‍याचे दिसून येत आहेत, असे असले तरी सोमवार ते शनिवारपर्यंत इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्‍या विद्यार्थ्यांना शंभर टक्के उपस्थितीसह शाळा पूर्णवेळ भरणार आहेत. रविवारी शाळा भरविण्यास्‍वरुपाचा निर्णय ऐच्छिक असेल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी स्‍पष्ट केलेले आहे.

कोरोना काळात शालेय अध्ययन प्रक्रिया प्रभावित झालेली हेाती. अशात ऑनलाइन शिक्षणावर संपूर्ण भिस्‍त असल्‍याने शिक्षणक्रम पूर्ण होऊ शकलेला नसल्‍याची स्‍थिती आहे. सामान्‍य परिस्थितीत शाळांचे वर्ग मार्च महिन्‍यापर्यंत भरविले जात असतात. परंतु कोरोना काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यंदा एप्रिलमध्ये पूर्णवेळ शाळा सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्‍यानुसार पहिली ते नववी तसेच अकरावीचे वर्ग दोन्ही सत्रात भरविले जाणार आहेत. तसे नियोजन आणख्याबाबतच्‍या सूचना शिक्षण विभागाने दिलेल्‍या आहेत. त्‍यामुळे सोमवार ते शनिवार दरम्‍यान शाळा नियमितरित्‍या भरणार आहेत. रविवारी शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय ऐच्‍छिक ठेवण्यात आलेला आहे.

एप्रिल उत्तरार्धात परीक्षा

गेल्‍यावर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा होऊ शकल्‍या नव्‍हत्या. परंतु यावर्षी परीक्षा प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भातील नियोजन पूर्ण झालेले आहे. असे असले तरी एप्रिलमध्ये शाळा सुरु ठेवण्यासंदर्भात निर्णयामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. साधारणतः एप्रिलच्‍या उत्तरार्धात परीक्षा घेतली जाण्याची शक्‍यता आहे. ही प्रक्रिया राबवून मे महिन्‍यात निकाल जाहीर केला जाणार आहे.

Web Title: Will School Be Open Full Time In Nashik District Sunday Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik