Excessive Rainfall Impacts Nashik’s Grape Production : नाशिक जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांमध्ये रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. यामुळे वाईन निर्मितीसाठी आवश्यक असणारे साखरेचे प्रमाण (ब्रिक्स) कमी होऊन वायनरी उद्योगावर थेट परिणाम होणार आहे.
लासलगाव: वाइन कॅपिटल अशी ख्याती असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने सर्वच शेतीपिकांची हानी झाली तशी ती द्राक्षाचीही झाली, तिचा परिणाम यंदा द्राक्ष उत्पादनात किमान तीस ते चाळीस टक्के घट येणार आहे.