Winter Food : थंडीमुळे नॉनव्हेज खवय्यांची पसंती मच्छीला; भाव स्थिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fish Dish

Winter Food : थंडीमुळे नॉनव्हेज खवय्यांची पसंती मच्छीला; भाव स्थिर

नाशिक : ढगाळ वातावरणामुळे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात शहरातील थंडीची तीव्रता कमी झालेली आहे. मात्र तज्ज्ञांचा सल्ला मानत अनेकांनी नॉनव्हेजला पसंती दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी मटणाचे दर सातशे पलीकडे गेल्याने खवय्यांची पसंती मच्छीला मिळत आहे. यात समुद्रातील माशांबरोबरच धरणातील म्हणजे गोड्या पाण्यातील माशांना अधिक पसंती मिळत आहे. (Winter Food Fish is preferred by non veg gourmands due to cold weather Price stable Nashik news)

शहरात चिकन व मटणाचे दुकाने गल्लोगल्ली असली तरी मच्छी घेण्यासाठी बाजारच गाठावे लागतो. शहरात जुन्या नाशिकमधील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या परिसरात मुख्य मच्छी बाजार भरतो. याशिवाय सिडको, सातपूर, वडाळा अशा विविध उपनगरांतही काही ठिकाणी मच्छीची दुकाने लागतात.

गंगाघाटावरील गोदातीरावर दर बुधवारी पारंपारिक आठवडे बाजार भरतो. या बाजारातच रामसेतूलगत मच्छी बाजार भरतो. या ठिकाणी समुद्रातील म्हणजे खाऱ्या पाण्यातील मच्छी बरोबरच धरणातील म्हणजे गोड्या पाण्यातील मच्छी उपलब्ध असते. ही मच्छी घेण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडते. तज्ज्ञांनीही मटनापेक्षा मच्छी खाण्याचा सल्ला दिल्याने अलीकडे मच्छी खाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात मुंबईतील खाऱ्या पाण्यातील माशांसह गंगापूर, कश्‍यपी, ओझरखेड, कश्‍यपी, आळंदी, लाडची आदी धरणातील म्हणजे गोड्या पाण्यातील मासे उपलब्ध असतात.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Success Story : कातळगावचा प्रणव बनला लढाऊ विमानाचा पायलट!

बोंबलाला वाढती मागणी

गंगाघाटावर खाऱ्या व गोड्या पाण्यातील माशांबरोबरच बोंबील बाजारही भरतो. या ठिकाणी साडेचारशे ते पाचशे रुपये किलोप्रमाणे बोंबील उपलब्ध आहेत. याशिवाय सुकट दोनशे चाळीस रुपये किलो तर सोडे पाचशेपासून दोन हजार रुपये किलोप्रमाणे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे बोंबील सुकविलेले असल्याने ते काहीकाळ साठवून ठेवता येतात. त्यामुळे ज्या ठिकाणी हिरवा भाजीपाला उपलब्ध नसतो, असे आदिवासी पाडे व दुर्गम भागात सुक्या बोंबीलला अधिक मागणी असते.

माशांचे दर (खाऱ्या पाण्यातील)-

वाम- ८०० ते १००० रुपये किलो
सुरमई- ८०० ते ९००
बांगडा- २४० ते ३००
ओले बोंबील- २००
कोळंबी- ६०० ते ८००
पापलेट- ९०० ते १०००

गोड्या पाण्यातील मासे

चोपडा- १५० ते २०० रुपये किलो
रऊ- १५० ते २००
कटला- १६० ते २००
कोंबडा- २०० ते २५०
हलवा- १२० ते १८०

हेही वाचा: Nashik News : आकडेमोडीत रमणारा अधिकारी पहिल्‍याच प्रयत्‍नात बनला Ironman