प्रचंड इच्छाशक्तीपुढे हरला कोरोना! तब्बल ३८ दिवसांची झुंज यशस्वी

दादाजी चव्हाण यांना अत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आले. एचआरसीटी स्कोर(HR-CT score) २२ व ऑक्सिजन लेव्हल(SpO2) ४५ पर्यंत घसरल्याने त्यांची स्थिती नाजूक बनली होती.
fight with corona
fight with corona e-sakal

नगरसूल (जि. नाशिक) : येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन दादाजी चव्हाण या साठीतील गृहस्थांनी कोरोनाला(corona) हरवले आहे. त्यांचा एचआरसीटी (HR-CT) स्कोर २२ होता. तर, ऑक्सिजन लेव्हल(SpO2) ४५ पर्यंत घसरली होती. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी घेतलेली मेहनत आणि दादाजी चव्हाण यांची जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व दुर्दम्य विश्‍वास यामुळे ३८ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज(discharge) मिळाला आहे. (With a strong desire to live he defeated Corona after 38 days of fighting)

HR-CT score २२, ऑक्सिजन लेव्हल ४५

आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या दादाजी चव्हाण यांनी ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून रुग्णालयात रुग्णसेवा प्रामाणिकपणे बजावत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. नगरसूल ग्रामीण रुग्णालयातच त्यांना १४ दिवसानंतर अत्यवस्थ(critical) स्थितीत दाखल करण्यात आले. एचआरसीटी स्कोर(HR-CT score) २२ व ऑक्सिजन लेव्हल(SpO2) ४५ पर्यंत घसरल्याने त्यांची स्थिती नाजूक बनली होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह रुग्णालय कर्मचारीही चिंतेत होते. प्रेमळ व दिलदार स्वभाव असलेल्या दादाजींसाठी सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. येथील रुग्णालयात उपचारासाठी कार्यरत असलेले डॉ. सतीश सूर्यवंशी, डॉ. जितेंद्र डोंगरे, डॉ. पार्श्‍व पटणी, डॉ. वसंत जाधव, डॉ. राकेश गावित, डॉ. सीमा सोनवणे, सतीश डोंगरे, मुख्यपरिचारिका मीरा खेडकर, अनिता निकम, अनिता शिंदे, मनीषा पाटील, सुरेखा येरोला, प्रतिभा चव्हाण, शबाना शेख, रिना वडांगळे यांचे अथक परिश्रम व दादाजी चव्हाण यांचा जगण्याचा दुर्दम्य विश्‍वास यामुळे तब्बल ३८ दिवस कोरोनाशी झुंज देऊन त्यांनी नवजीवनास प्रारंभ केला आहे. शनिवारी रुग्णालयातून बरे होऊन परततांना कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

fight with corona
'सरकारला मराठा, धनगर आरक्षण द्यायचेच नाही'

''सेवा बजावत असतानाच कोरोना संसर्ग झाला. नगरसूल ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व ग्रामस्थांचे प्रेम व पाठबळ यामुळे आत्मविश्‍वास वाढला. मी कोरोनावर मात केली.''

- दादाजी चव्हाण, नगरसूल.

fight with corona
ऐकावं ते नवल, 'अमिताभ', 'डोनाल्ड ट्रंम्पच्या' नावानं 'इ - पास'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com