esakal | ऐकावं ते नवल, 'अमिताभ', 'डोनाल्ड ट्रंम्पच्या' नावानं 'इ - पास'
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh and Donald Trump

ऐकावं ते नवल, 'अमिताभ', 'डोनाल्ड ट्रंम्पच्या' नावानं 'इ - पास'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाच्या वाढणा-या प्रमाणामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. जेणेकरुन नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे यासाठी प्रशासन सतत वेगवेगळे नियमांची अंमलबजावणी करत आहे. एकीकडे औषधांचा तुटवडा जाणवत आहे. व्हॅक्सिनेशनमध्ये अडचणी येत आहे. त्यामुळे कोरोनाची आकडेवारी वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांना आंतरजिल्हा, तसेच विविध जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र हिमाचल प्रदेशमधील फेक इ पासची घटना जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते.

यापूर्वी वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या महत्वाच्या ओळखपत्रावर बॉलीवूड सेलिब्रेटींची नावं आढळली होती. त्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा झाली होती. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावानं एक फेक इ पास (fake e pass) तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आलीय. हिमाचल प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. एकीकडे पूर्ण देश कोरोनाच्या संकटात असताना दुसरीकडे अशाप्रकारच्या घटना समोर आल्यानं सर्वसामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होताना दिसत आहे.

राज्य सरकारनं अत्यावश्यक कारणासाठी परराज्यात जाण्यासाठी इ पासची व्यवस्था केली आहे. त्यात हिमाचल प्रदेशाचेही नाव घ्यावे लागेल. मात्र त्या पासमध्ये जेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा गोंधळ समोर आला तेव्हा सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावानं फेक इ पास तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा: बॉलीवूडमधील 25 हजार कामगारांच्या बॅंक खात्यात 'भाईजान'चे पैसे

हेही वाचा: 'चाळीस वर्ष दिली साथ, कोरोनानं शेवटी घात केलाच'

ज्यावेळी अशाप्रकारचा फेक इ पास तयार करण्यात आला तेव्हा शिमला पोलिसांकडे त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिमला पोलिसांनी तो पास जप्त केला आहे. याप्रकरणाला पोलिसांनी गंभीरतेनं घेतलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर याप्रकरणाचा खुलासाही केला आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सध्या हिमाचलमध्येही कोरोनाच्या केसेस मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे 27 एप्रिलपासून इ पास अनिवार्य करण्यात आला आहे.