रणरणत्या उन्हाबरोबर टॅंकरही वाढले

राज्यात २१३ गावे अन् ५६३ वाड्यांसाठी १८७ टँकर धावताहेत
Water tanker
Water tankerSakal

नाशिक - सूर्यनारायण आग ओकतोय तसे राज्यातील जनतेच्या घशाची कोरड वाढत चालली आहे. त्यातच पिण्यासाठी पाणी आटल्याने सरकारला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. राज्यातील २१३ गावे आणि ५६३ गावांसाठी १८७ टँकर धावताहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ७४ टँकर वाढले आहेत. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात म्हणजे निम्म्या महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत एकही टँकर सुरू नव्हता. गेल्या आठवड्यात ११८ गावे आणि ३५८ वाड्यांना ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. जिल्हानिहाय गावे आणि वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे अनुक्रमे असून (कंसात सुरू असलेल्या टँकरची संख्या दर्शवते) : ठाणे-२३-११३ (२६), रायगड-३४-१४९ (१९), रत्नागिरी-२६-३४ (५), पालघर-१३-५८ (२५), नाशिक-४३-१५ (३१), धुळे-१-२ (१), नंदूरबार-०-२ (१), जळगाव-२-० (२), नगर-१२-२८ (११), पुणे-२२-१५७ (२७), सांगली-२-५ (२), जालना-४-० (४), हिंगोली-६-० (८), नांदेड-१-० (१), वाशिम-२-० (२), बुलढाणा-१२-० (१२), यवतमाळ-१०-० (१०).

गेल्या वर्षीएवढा जलसाठा

राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू अशा एकुण ३ हजार २६७ प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षीइतका जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी ४३.१२ टक्के, तर आता ४३.११ टक्के जलसाठा आहे. मोठ्या १४१ प्रकल्पांमधील जलसाठा मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी ४३.८४ टक्के, तर आता ४१.५८ टक्के जलसाठा आहे. २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी ५२.५८ टक्के जलसाठा होता. आता ४९.२५ टक्के जलसाठा उरला आहे. २ हजार ८६८ लघू प्रकल्पांमध्ये मात्र गेल्यावर्षीपेक्षा अधिकचा जलसाठा आहे. गेल्यावर्षी ३१.८६ टक्के जलसाठा होता. आता ४४.८१ टक्के जलसाठा आहे. विभागनिहाय सर्व धरणांमधील आत्ताच्या जलसाठ्याची टक्केवारी अशी : अमरावती-५१.१८, औरंगाबाद-५२.२२, कोकण-४८.९८, नागपूर-३९.४४, नाशिक-४२.६५, पुणे-३६.४६. गेल्यावर्षीचा याच कालखंडाचा विचार करता, अमरावती, औरंगाबाद विभागामध्ये अधिकचा जलसाठा आहे. मात्र उर्वरित कोकण, नागपूर, नाशिक, पुणे विभागात कमी जलसाठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com