नाशिक : सिटीलिंकतर्फे फुकट्या प्रवाशांना मिळणार प्रसिद्धी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citylinc

नाशिक : सिटीलिंकतर्फे फुकट्या प्रवाशांना मिळणार प्रसिद्धी

नाशिक : नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका (NMC) तोट्याचा विचार न करता सिटीलिंक (Citylinc) ही परिवहन सेवा (Transport service) चालविते, मात्र त्याचा काही फुकटे लाभ घेत असल्याने सिटीलिंकचा तोटा (Loss) वाढतो आहे. फुकट्या प्रवाशांपासून होणारा तोटा कमी करण्यासाठी सिटीलिंक यंत्रणा फुकट्यावरील कारवाईला प्रसिध्दी देण्याचा विचार करीत आहे. (Without ticket Passengers will get publicity from Citylinc new idea Nashik News)

हेही वाचा: Nashik : अमेरिकेत मराठी शाळांमध्ये शिवरायांचा जयघोष

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करतानाचे छायाचित्र विनातिकीट प्रवासी म्हणून प्रसिद्ध करता येतील का याचा महापालिका यंत्रणा विचार करीत आहे. बससेवा सुरू झाल्यापासून फुकट्या प्रवाशांचा त्रास सुरू आहे. सिटीलिंक कंपनीने आतापर्यंत अशा फुकट्या प्रवाशांकडून ३ लाख ५ हजार ७८७ रुपये दंड वसूल केला आहे. परंतु, ही कारवाई दंडापुरती न ठेवता व अधिक कडक कारवाईचा सिटी लिंक यंत्रणा विचार करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईसोबत त्यांचे छायाचित्र काढून विनातिकीट प्रवासी म्हणून प्रसिद्ध करता येतील का, असा विचार सुरू आहे. सिटीलिंकने दक्षता विभागांतर्गत ६४ जणांची नियुक्ती केली आहे. या पथकांनी जुलै २०२१ ते एप्रिल २०२२ या दहा महिन्यांत ७२ हजार १३३ बसमध्ये प्रवासी आणि वाहकाच्या तिकीट वितरणाची छाननी केली. त्याअंतर्गत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तीन लाख ५७८७ रुपये दंड वसूल केला.

हेही वाचा: कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल; कमी भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Web Title: Without Ticket Passengers Will Get Publicity From Citylinc New Idea Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top