नाशिक: संशयित पतीने पत्नीला गुंगीकारक औषध पाजून तिचे अपहरण केले. तिचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला डान्स बारमध्ये नाचकाम करण्यास भाग पाडल्याप्रकरणी संशयित पतीसह त्याच्या मित्राविरोधात अपहरणासह विविध कलमान्वये पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे संशयित फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.