

nashik crime
esakal
जादूटोण्याची भीती दाखवून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाविरुद्ध नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने महिलेला स्मशानातील पूजेचे आमिष दाखवले आणि पुस्तकात लिहिलेल्या पती व मुलांच्या नावांपैकी एकाचा बळी जाईल, अशी धमकी देऊन तिच्यावर दबाव आणला. या प्रकरणाने नाशिक जिल्हा हादरला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.