esakal | ‘बालविवाह' प्रकरण : गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेनी मागितले 25 लाख ; गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

‘बालविवाह' प्रकरण : गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेनी मागितले 25 लाख ; गुन्हा दाखल
‘बालविवाह' प्रकरण : गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेनी मागितले 25 लाख ; गुन्हा दाखल
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

लासलगाव (जि.नाशिक) : जळगाव जिल्ह्यातील बालविवाह प्रकरणात २५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी लासलगावची निवड का करण्यात आली असावी, याबाबत येथे जोरदार चर्चा रंगली होती. काय घडले नेमके?

२५ लाख रुपयांची खंडणी मागितली

जामनेर येथील अल्केश झुंबरलाल ललवाणी व त्यांचे बंधू पारस ललवाणी यांच्याविरुद्ध या महिलेने जामनेर पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा व बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्हा मागे घेण्यासाठी तिने व तिच्या साथीदारांनी ललवाणी कुटुंबीयांकडे सुमारे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. रक्कम न दिल्यास न्यायालयात खोटे जबाब देऊन अडकविण्याची धमकीही देण्यात आलेली होती. ही रक्कम लासलगावजवळील टाकळी विंचूर शिवारात एका लॉजवर देण्याचे ठरले होते. यासंदर्भात अल्केश ललवाणी यांनी लासलगाव पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी लॉजवर धाड टाकत खंडणी मागितलेल्या रकमेपैकी सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज घेताना श्रीरामपूर येथील या महिलेला अटक केली आहे.

हेही वाचा: नवजात चिमुरडा बनला कोरोना योध्दा! स्कोर १२ असूनही यशस्वी मात

लासलगावची निवड का?

तर या गुन्ह्यामध्ये महिलेला मदत करणारे प्रफुल लोढा (रा. जामनेर), सुनील कोचर (रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) या दोघांविरुद्धदेखील लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील या प्रकरणात २५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी लासलगावची निवड का करण्यात आली असावी, याबाबत येथे जोरदार चर्चा रंगली होती.

महिलेसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर (जि. जळगाव) येथील ललवाणी कुटुंबीयांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या व त्यापैकी ५० हजार रुपये स्वीकारत असलेल्या श्रीरामपूर येथील महिलेस पोलिसांनी बुधवारी अटक केली. लासलगाव पोलिसांनी बुधवारी (ता. २८) दुपारी येथील रेल्वे स्टेशन रोडवरील एका लॉजमध्ये ही कारवाई केली. याप्रकरणी संबंधित महिलेसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.