esakal | नवजात चिमुरडा बनला कोरोना योध्दा! स्कोर १२ असूनही यशस्वी मात

बोलून बातमी शोधा

baby
नवजात चिमुरडा बनला कोरोना योध्दा! स्कोर १२ असूनही यशस्वी मात
sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : रुणालयात प्रसूतीदरम्‍यान मातेने दोन किलो ७६० ग्रॅम वजनाच्‍या गोंडस बालकाला जन्‍म दिला. महिलेच्‍या कुटुंबात नव्‍या सदस्‍यांचे स्‍वागत करत जल्‍लोष करण्यात आला; पण बालकाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला.

नवजात बालकाची कोरोनावर मात

जन्‍मानंतर काही तासांतच बालकाला श्‍वसनाला त्रास होऊ लागल्‍याने तपासणी केली. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाळाला ऑक्सिजनवर ठेवले. बाळाच्या हृदयाची गती व रक्तदाब कमी झाल्याचे निदर्शनास आले. फुफ्फुसांमध्ये निमोनियाची लक्षणे दिसून आली. बाळाच्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत दोष असल्याचे निदर्शनास आले. त्यात बाळाचा एचआरसीटी स्कोर १२ होता. जलदगतीने उपचार करत वैद्यकीय संचालक व बालरोगतज्‍ज्ञ डॉ. सुशील पारख, डॉ. नेहा मुखी, डॉ. पूजा चाफळकर या डॉक्‍टरांच्‍या टीमने बाळावर उपचार सुरू केले. तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधा, सर्व कनिष्ठ डॉक्टरांचे परिश्रम व उपचार पद्धतीच्या जोरावर १८ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर या बाळाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांच्या चमूला यश आले. बालकाला कोरोनाचे निदान झाल्‍यानंतर त्‍याच्‍यावर अशोका मेडिकव्‍हर हॉस्‍पिटलमध्ये यशस्‍वी उपचार करण्यात आले.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

देशातील पहिली घटना असल्‍याचा दावा

डॉ. पारख म्‍हणाले, की गर्भवती असताना, शेवटच्या तीन महिन्यांत बाळाच्या आईला नकळतपणे कोविडचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बाळाच्या आईमध्ये निर्माण झालेले अँटीबॉडीज नाळद्वारे बाळाच्या शरीरामध्ये पोचले व त्यामुळे बाळाच्या फुफ्फुस, हृदय, व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला. याला वैद्यकीय भाषेत एफआयआरएस म्हणतात. एक दिवसाच्या बाळामध्ये आढळलेली एफआयआरएस जगात एखाद दुसऱ्या घटनेचा उल्लेख वैद्यकीय शास्त्रात आहे. भारतात ही पहिली घटना असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर