Water Crisis : सिडकोतील पाणीपुरवठा विस्कळित; पाण्यासाठी वणवण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water crisis

Water Crisis : सिडकोतील पाणीपुरवठा विस्कळित; पाण्यासाठी वणवण!

सिडको (जि. नाशिक) : परिसरातील शुभम पार्क व कॉलनी भागात गेल्या काही दिवसांपासून पिण्यापुरते ही पाणी येत नसल्याने महिला (Women) व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Women citizens angry as drinking water was not coming to Shubham Park Colony areas for past few days nashik news)

उन्हाळ्याला सुरवात होत नाही तोच पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिलांनी पवननगर येथील जलकुंभावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास विभागीय कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह त्रस्त झालेल्या महिलांनी दिला आहे.

अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे. तसेच, प्रशासकीय राजवट असल्याने अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेविका रत्नमाला राणे यांनी केला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून त्रिमूर्ती चौक येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने सावता नगर, पवननगर, रायगड चौक या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. आता पुन्हा शुभम पार्क भागात गेल्या तीन दिवसापासून नागरिकांना पिण्यापुरते देखील पाणी मिळत नाही.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

परिसरातील नागरिकांनी हातपंपावर जाऊन पिण्यापुरते पाणी मिळवले. मात्र महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार करून देखील अधिकारी फोन देखील उचलत नसल्याने महिला वर्गाने संताप व्यक्त केला आहे. महापालिकेने परिसरात पाणी गळती थांबून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी महिला वर्गाकडून करण्यात आली आहे.

तीन दिवसापासून समस्या जैसे थे

गेल्या तीन दिवसापासून राजरत्ननगर, साईबाबानगर, शुभम पार्क, रामेश्वरनगर या भागात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. कधी पाइपलाइन फुटली तर कधी धरणावर लाइट नाही अशी उत्तरे देऊन अधिकारी टाळाटाळ करत आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी न देणे, वेळेवर पाणी न येणे यासारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. या वेळी वंदना पाटील, लीला सोनवणे, कावेरी गवयी, स्नेहल दीक्षित, अनिता केदारे उपस्थित होत्या.

अधिकारी नॉट रिचेबल

पाणी पुरवठा अधिकारी यांना सकाळपासूनच नागरिक पाण्याच्या समस्या सुटण्यासाठी फोन करत असून अधिकारी मात्र नॉट रिचेबल असल्याने समस्या सुटणार कधी, सोडवणार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :NashikWater Scarcitycidco