नाशिकरोड- मध्य रेल्वेने जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांसह प्रतिष्ठित वंदे भारत एक्स्प्रेस चालवली. ट्रेन क्रमांक २२२२३, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस ही महिला कर्मचाऱ्यांनी चालवली. ज्यामुळे हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवास ठरला. ही गाडी आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव, सहाय्यक लोको पायलट संगीता कुमारी यांनी चालवली.