Nashik : आठवडे बाजारात महिलांची धान्य खरेदीसाठी लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weekly market

Nashik : आठवडे बाजारात महिलांची धान्य खरेदीसाठी लगबग

नाशिक : बुधवारच्या आठवडे बाजारात (Weekly Market) धान्य, मसाले, खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी (Crowd) झाली होती. पावसाळा (Monsoon) तोंडावर असताना धान्‍य साठवणूकीकडे (Stocking) महिलांचा कल असतो. आपले कोठीघर भरलेले असावे असे प्रत्‍येक महिलेला वाटत असते. उन्हाळ्यात धान्याची खरेदी करून धान्‍य उन्हात वाळवून साठवणूक केली जाते. (women crowded market to buy food grains Nashik News)

बुधवारच्या बाजारात आसपासच्या गावातून शेतकरी माल विक्रीसाठी आणतो. यात छोटे, मोठे असे अनेक विक्रेते आपला माल विक्रीसाठी बाजारात आणताना दिसतात. विक्रेता सकाळपासूनच जिथे जागा मिळेल तिथे आपले दुकान थाटून ग्राहकांच्या सेवेत हजर असतो. उष्‍णतेपासून संरक्षण व्हावे म्‍हणून बांबू रोवून त्‍यावर निळ्या कागदाची शेड लावून आपले दुकान थाटतो. गर्मीची पर्वा न करता छोट्या जागेत व्यवस्थितरीत्या मालाचे वर्गीकरण करून माल विक्रीसाठी ठेवतात. बहुतांश शेतकरी असल्‍याने चांगला दर व नवा माल मिळेल या आशेने आठवडे बाजारात महिलांनी धान्य खरेदीसाठी गर्दी केली होती. तसेच मसाल्‍याचे पदार्थ, गहू, तांदूळ अशा विविध कडधान्य साठवणूक करण्यासाठी महिलांची बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू होती. आठवडे बाजार गजबजून गेला होता.

हेही वाचा: Nashik : अंदरसूलला वादळी वाऱ्याचा तडाखा

धान्‍याचे भाव किलोप्रमाणे

तूरडाळ ८० ते १०० रुपये

चणाडाळ- ७० रुपये

मठ, हिरवे मुग, मुगाची दाळ, चवळी, पांढरी, काळी उडीदडाळ -१०० रुपये

हरभरा, वटाणा- ६० ते ८० रुपये

मोहरी-९० रुपये

हेही वाचा: हनुमान जन्मस्थळ वाद : शास्त्रार्थ चर्चेला रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य

Web Title: Women Crowded Market To Buy Food Grains Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikwomenWeekly Bazar
go to top