पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रपठणातून सकारात्मकता, मानसिक समाधान | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

female priest vinaya nirantar

पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रपठणातून सकारात्मकता, मानसिक समाधान

नाशिक : सासरी तिळभांडेश्‍वरीचे मानकरी असल्‍याने, तसेच लहानपणापासूनच धार्मिकतेची ओढ होतीच. सासरी आल्यावर यास वाव मिळाल्‍याने पौरोहित्‍याचा प्रवास सुरू केला, असे विनया निरंतर यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना त्‍यांच्या अनुभवाविषयी वर्णन केले. निरंतर यांचे माहेर व सासर हे नाशिकचेच. माहेरी लहानपणापासून धार्मिक कुलधर्म- कुलाचार याची जाण होती. (women rule in priesthood female priest vinaya nirantar nashik latest marathi news)

तिळभांडेश्‍वरीच्या पालखीचे मानकरी असल्‍याने श्रावण महिना, महाशिवरात्र, प्रदोष या दिवशीचे आयोजन, नैवेद्य याविषयी अधिकतेनं व जवळून सगळे हाताळताना पूजेविषयीचे कुतूहल वाढत गेले. तसेच त्यांची नणंद शैलजा देव यांनी पौरोहित्‍याचा वर्गात प्रवेश घेतल्‍यावर तर मग आपणही प्रवेश घ्‍यावा, असे त्‍यांना वाटले.

१९९७ मध्ये त्‍यांनी दुर्गा मंगल कार्यालयातील वर्गात प्रवेश घेतला तिथे करमरकर यांचे मार्गदर्शन त्‍यांना मिळाले. २ वर्ष दुर्गा मंगल कार्यालयात व पुढील ३ वर्षे त्‍यांनी राणी भवन येथे शिक्षण घेतले. त्‍यांना जयश्री कुलकर्णी यांचे मार्गर्शन मिळाले. पुढील वेदोक्‍त शिक्षणासाठी त्‍यांना साने गुरुजी व श्रीमती दुगल यांचे मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा: मंदीची चाहूल : कर्ज घेऊन प्रकल्प उभारणारे संकटात सापडण्याची चिन्हे

कुटुंबाकडून त्‍यांना पाठिंबा मिळाला, सासरी एकत्र कुटुंबात असल्‍याने सहकार्य मिळाले. तसेच, मुलावरही सकारात्‍मक परिणाम झाला. तोही पौराहित्‍याचे शिक्षण घेत आहे. मंत्रोच्चारातून मिळणारी ऊर्जा व त्‍याचा आपल्‍या शरीरावर होणारा परिणाम हा सकारात्‍मक होतो.

हा त्‍यांचा प्रत्‍यक्ष अनुभव सांगताना त्‍यांनी सांगितले, की सप्तशृंगीच्या गाभाऱ्यात केलेले सामूहिक पाठातून मिळणारी ऊर्जा व समाधान उच्चप्रतीचे होते. तसेच रामेश्वर, गंगापूर रोड येथे सत्‍यनारायणाची पूजा सांगण्यासाठी गेल्‍या असता तेथील सर्व ज्‍येष्‍ठ मंडळी असल्‍याने तसेच पूजा झाल्‍यावर त्‍यांच्या मिळालेल्‍या समाधानकारक प्रतिक्रिया अजूनही स्‍मरणात आहे.

हेही वाचा: आदिवासीच्या कार्यकारी अभियंत्याला 29 लाखांची लाच घेताना अटक

Web Title: Women Rule In Priesthood Female Priest Vinaya Nirantar Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..