Womens Day 2023 : कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या जहाँआरा शेख! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

womens day 2023 Jahanara Shaikh devoted entire life to her family nashik news

Womens Day 2023 : कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या जहाँआरा शेख!

जुने नाशिक : वडिलांच्या मुत्यूनंतर कुटुंबाचा गाडा ओढताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लिपिक ते महिला (Women) कामगार अधिकारी प्रवास करत जहाँआरा शेख समाजात यशस्वी ठरल्या आहेत. (womens day 2023 Jahanara Shaikh devoted entire life to her family nashik news)

प्रत्यक्ष आयुर्मानात मात्र स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळच मिळाला नाही. आजही त्या अविवाहित राहून, आयुष्याच्या अंधारात कुटुंबाचे जीवन प्रकाशमान करत आहे.

संघर्षाचे दुसरे नाव अर्थात महिला असे म्हटले जाते. त्याचे उत्तम उदाहरण जहाँआरा शेख या आहेत. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी वेचून घेतले आहेत. कुटुंबाच्या उदाहरनिर्वासाठी स्वतः अविवाहित राहून भावंडांचे मोठ्या धुमधडाक्यात विवाह लावून देत त्यांचे संसार थाटले आहे.

शासकीय नोकरी आणि कुटुंबाचा आधारस्तंभ अशा दोन्ही भूमिका अतिशय योग्यरीत्या पार पाडल्या. ३१ मार्चला सेवानिवृत्त होत शासकीय नोकरीच्या जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. कुटुंबाची जबाबदारी मात्र सदैव त्यांच्यावर राहणार आहे. जहाँआरा शेख, राज्य परिवहन महामंडळ कार्यालयात महिला कामगार अधिकारी म्हणून सध्या नियुक्त आहेत.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

अतिशय खडतर प्रवास करत त्या या पदापर्यंत पोचल्या आहेत. त्यांचे वडील राज्य परिवहन महामंडळ विभागात यांत्रिकी कर्मचारी म्हणून नियुक्त होते. त्यांच्या निधनानंतर कमी वयात कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांना चार बहीण आणि एक भाऊ आहे.

शासकीय नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना बहिण भावाचे विवाह टप्प्याटप्प्याने लावून दिले. त्यांना त्यांचे संसार उभे करून दिले. २०१७ ला सहाय्यक कामगार अधिकारी म्हणून मुंबई मध्यवर्ती कार्यालयात त्यांची नियुक्ती झाली.

नाशिक, धुळे, मुंबई असा नोकरीचा प्रवास करत त्या काम करत राहिल्या. १ ऑगस्ट २०१९ रोजी विभागाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना कामगार अधिकारी म्हणून बढती देत नाशिक विभागात नियुक्त केले. सध्या त्या शहरात कर्तव्यावर असून ३१ मार्चला निवृत्त होणार आहे. कामगार अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहे.