नाशिकरोड बालेकिल्ला शाबूत ठेवण्यास आत्तापासूनच कामास लागा : सुनील बागूल

Work from now on to keep Shivsena power in Nashik Road Sunil Bagul
Work from now on to keep Shivsena power in Nashik Road Sunil Bagul esakal

नाशिक : नाशिकरोड शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असून, यंदाच्या महापालिका निवडणुकीत (NMC Election) पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक (Corporate) निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामास लागा, असे आवाहन शिवसेना उपनेते सुनील बागूल यांनी केले.

शालिमार कार्यालयात नाशिकरोड विभागातील प्रभाग २२, २३, २४, २५, २६ व ४१, ४२, ४३ मधील पक्षाचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख व अंगीकृत संघटनांचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप उपस्थित होते.

Work from now on to keep Shivsena power in Nashik Road Sunil Bagul
केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची घोषणा

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) जनहिताचे विविध निर्णय घेतले आणि विविध उपक्रमही राबविले आहेत. ते जनतेपर्यंत पोहोचवा, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले. शिवसेना सामान्यांचे हित जोपासणारा पक्ष आहे. कोरोना काळात पक्षाने केलेल्या कामाला तोड नाही. लोकांनाही शिवसेनेची महापालिकेवर एकहाती सत्ता यावी, असे वाटते आणि या संधीचे सोने करण्यासाठी तनमनधनाने कामाला लागा, असे आवाहन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. भाजपच्या नेत्यांनी शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध खोटेनाटे आरोप केले आहेत ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही व त्यास शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देण्यास आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असा इशाराही श्री. बडगुजर यांनी दिला.

Work from now on to keep Shivsena power in Nashik Road Sunil Bagul
Satara; शरद पवारांच्या घरावरील हल्ला म्हणजे, महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला : प्रभाकर देशमुख

उपस्थित मान्यवरांनी नाशिकरोड भागातील प्रत्येक प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करून प्रभागात सदस्य नोंदणी मोहिमेस मिळालेला प्रतिसाद, मतदारयाद्यांचा अभ्यास केला का? २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना व प्रतिस्पर्धी उमेदवारांना मिळालेली मते, जेथे पराभव झाला त्याची कारणे आदी बाबींचा आढावा घेतला. माजी महापौर नयना घोलप, केशव पोरजे, नितीन चिडे, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, ज्योती देवरे, स्वाती पाटील, प्रज्ञा गायकवाड, योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे, योगेश देशमुख, शिवा तकाटे, मसूद जिलानी, श्रीकांत मगर, स्वप्नील औटे, गणेश गडाख, नितीन खर्जुल, अमित भगत, उमेश शिंदे, योगेश नागरे, विकास ढकोलिया, संग्राम फडके, कुलदीप आढाव, सागर निकाळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com