Talathi Mega Bharati : तलाठी मेगाभरतीविषयी आजपासून कार्यशाळा; जाणून घ्या तपशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Talathi Bharti Recruitment

Talathi Mega Bharati : तलाठी मेगाभरतीविषयी आजपासून कार्यशाळा; जाणून घ्या तपशील

नाशिक : राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti २०२३) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात १५ मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले आहेत.

.याच पार्श्वभूमीवर या भरतीसंदर्भात एज्युकेशन ॲकॅडमीतर्फे भरती संदर्भात १ व ५ मार्च रोजी पाच दिवसीय कार्यशाळा संजीवनी संकुल, अशोक स्तंभ नाशिक येथे दुपारी १२ ते ३ दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. (Workshop on Talathi Mega Bharati from today nashik news)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

या परीक्षेसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधारक पात्र असतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन एज्युकेशन ॲकॅडमीचे संचालक प्राध्यापक राहुल शिंदे यांनी केले आहे.

या भरती संदर्भातील अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, विषय संरचना या विषयी शिक्षण विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९८२२०८६४८३ या क्रमांकावर नाव नोंदणी आवश्यक असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन एज्युकेशन ॲकॅडमीचे संचालक प्रा. शिंदे यांनी केले आहे.