
World Breastfeeding Week 2022 : बाळाची इच्छा असेपर्यंत द्यावे स्तनपान
नाशिक : आईला बाळाकडून संकेत मिळाल्यावर स्तनपान देण्यास प्रोत्साहन द्यावे. स्तनपान करताना बाळाचे पूर्ण शरीर आईच्या समोर असावे. बाळाचे डोके, मान यांना शरीराच्या एका रेषेत आधार मिळावा. बाळाची इच्छा असेपर्यंत त्याला स्तनपान द्यावे.
पहिले सहा महिने बाळाला पाणी पाजण्याची गरज नसते. दुधातून बाळाला अधिक प्रमाणातील लॅक्टोज, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी मिळते. यामुळे त्याची तहानही भागते. (World Breastfeeding Week 2022 Breastfeed as long as baby wants Nashik latest marathi news)
हेही वाचा: Jal Jeevan Missionच्या कामांत दिरंगाई झाल्यास दंडात्मक कारवाई होणार
हे घटक अग्रभागातील दुधातून मिळतात. मागील भागातील दुधात स्निग्धांश मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे बाळाची भूक भागते. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी हे आवश्यक असते. बाळाची इच्छा असेपर्यंत म्हणजे जेव्हा बाळ आईपासून विलग होते, तेव्हा बाळाची तहानभूक पूर्ण झाली आहे, असे समजावे.
स्तनपान दिल्यानंतर बाळाला बाळाला उभ्या स्थितीत कडेवर घ्यावे वा मांडीवर बसवावे आणि अलगद हात पाठीवरून फिरवावा कारण स्तनपान करताना बाळ हवाही पोटात घेत असते. याने ढेकर येऊन हवा बाहेर पडते. असे केल्याने बाळाला अतिरिक्त हवेमुळे होणारी उलटी यापासून बचाव होतो.
"आईला स्तनपानात स्वारस्य असणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच बाळ आणि आई यांच्यातले भावबंध इतके जुळलेले असते की बाळाला भूक लागली असता आईला संकेत मिळतात. आईने बाळाला त्याची इच्छा असेपर्यंत स्तनपान देणे आवश्यक आहे."
- स्वाती सावंत, स्त्रीरोग तज्ञ, जिजामाता प्रसूतिगृह
हेही वाचा: देवगाव आश्रमशाळेतील ‘त्या’ शिक्षकाची बदली
Web Title: World Breastfeeding Week 2022 Breastfeed As Long As Baby Wants Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..