नामपूर- चिऊताईच्या गोष्टी ऐकून प्रत्येकाचे बालपण समृद्ध झाले आहे. परंतु गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, अवकाळी पाऊस, जागतिक तापमानवाढ, गारपीट, रोगट हवामान, कानाकोपऱ्यात पोहोचलेले मोबाईलचे जाळे आदी बाबींमुळे चिमण्यांचा किलबिलाट नाहीसा होत चालला आहे. चिमण्यांची घटती संख्या पर्यावरणासाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. त्यामुळे चिमणी संवर्धन काळाची गरज आहे. "A Tribute to Nature's Tiny Messengers" ही यंदाच्या जागतिक चिमणी दिनाची थीम आहे.