depression
sakal
निखिल रोकडे- नाशिक: आयुष्यातील एखाद्या टप्प्यावरील नैराश्य किंवा एखाद्या प्रसंगात रागाच्या भरात उद्विग्न होऊन थेट जीवनयात्रा संपविण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले जाते; परंतु सामाजिक जाणिवा जागरुक ठेवल्यास बहुतांश आत्महत्या रोखता येणे शक्य असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी आप्तस्वकीयांना योग्यवेळी भावनिक आधार देत पीडितांना या दुष्टचक्रातून वाचविण्याची साध यानिमित्त दिली आहे. अशा घटना टाळण्यासाठी निश्चितच तणावमुक्त जीवनशैली व मनमोकळेपणे सकारात्मक संवाद नातेसंबंध व मित्र परिवारात वाढविण्याची आवश्यकता आहे.