World Toilet Day : कोरोनानंतर वाढला शौचालयाचा वापर!

World Toilet Day
World Toilet Dayesakal

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा हागणदारीमुक्त घोषीत झाल्यानंतर मागेल त्यास शौचालय दिले जात आहे. शौचालय दिल्यानंतर त्याच्या वापरासाठी कोरोना संकटापूर्वी मोठी जगनजागृती करावी लागत होती. परंतू, कोरोना संकटानंतर जिल्हयाच्या ग्रामीण भागात शौचालयांचा वापर वाढला आहे. कोरोनानंतर गत दीड वर्षात तीन हजार १३६ कुटुंबियांनी शौचालयाची मागणी नोंदविली आहे. यातील २ हजार ५०० शौचालयांचे बाँधकाम पूर्ण झाले आहेत. ६८६ शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असून ती मार्च २०२३ अखेर पूर्ण करण्य़ाचे आवाहन आहे. (world toilet day after corona increasing numbers 6 lakh families in district use toilet Nashik News)

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात नाशिक जिल्हयाने भरीव कामगिरी केली आहे. या अभियानंतर्गत आतापर्यंत ग्रामीण भागात ५ लाख ९७ ८८५ कुटुंबियांना शौचालय उभारणी केली आहे. जिल्हयातील ८०८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. यंदा तीन तालुक्यांसह ५०८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात आलेल्या आहेत. दोन वर्षापासून स्वच्छ भारत अभियानात जिल्हा सातत्याने आघाडीवर राहिला आहे. अभियानातंर्गत शौचालय लाभार्थ्यांस दिले जाते.

मात्र, घर बांधकाम करताना शौचालय बांधकाम करण्याचा कल वाढला आहे. शौचालय वापराबाबत जनमाणसात जनजागृती करण्यासाठी यंत्रणेला मोठे कष्ट घ्यावे लागत होते. मात्र, कोरोना संकटानंतर ग्रामीण भागात शौचालय वापराची मोठी जगनजागृती झाली आहे. शौचालये व आरोग्याचे महत्व कोरोनात अधिकच अधोरेखीत झाले, त्यामुळे गावाबाहेरील रस्त्यावर उघडयावर हागणदारीचे दिसणारे चित्र आता बंद झाले आहे.

शौचालय वापराचे महत्व वाढल्यानंतर दीड वर्षात शौचालयासाठी लाभार्थ्यांची स्वत ः हून मागणी नोंदविण्यात येऊ लागली. एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२२ दरम्यान, ३ हजार १३६ कुटुबियांनी शौचालयाची मागणी केली आहे. यातील २४५० पूर्ण झाले असून ६८६ अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात आता ६ लाख १ हजार २१ कुटुंबियांकडे शौचालय आहेत.

World Toilet Day
Nashik Accident Case : ‘त्या’ मद्यधुंद कारचालकाची झिंग दुसऱ्या दिवशीही तशीच

शौचालय बांधलेली तालुकानिहाय कुटुंबे

बागलाण (५५ हजार ४३), चांदवड (३७ हजार ४३९), देवळा (२२ हजार ५१५), दिंडोरी (४५ हजार ८१३), इगतपुरी (३४ हजार ८४०), कळवण (३१ हजार ५६२), मालेगाव (६९ हजार ६४९), नांदगाव (३४ हजार ६९७), नाशिक (२५ हजार ९१५), निफाड (७२ हजार १११), पेठ (२२ हजार ५३३), सिन्नर (४४ हजार ४२६), सुरगाणा (३४ हजार ३१), त्र्यंबकेश्वर (२५ हजार ६१७), येवला (४४ हजार ८३०).

दीड वर्षातील शौचालयाची उद्दिष्ट

बागलाण (१६८), चांदवड (१५०), देवळा (८२), दिंडोरी (३२३), इगतपुरी (२०५), कळवण (३३०), मालेगाव (२००), नांदगाव (१४०), नाशिक (१००), निफाड (२३१), पेठ (१०७), सिन्नर (१०१), सुरगाणा (१०१), त्र्यंबकेश्वर (१५०), येवला (४५६).

आदर्श झालेली गावे

अवनखेड, लोखंडेवाडी, गोडेंगाव (ता. दिंडोरी), शिरसाठे (ता. इगतपुरी), शिरसाणे (ता. चांदवड), माळेगाव (ता. सिन्नर), ओढा, दरी (ता. नाशिक), पिंपळगाव (ता. निफाड), किकवारी (ता. बागलाण), बोरवड (ता. पेठ).

"जिल्हा हागणदारीमुक्त घोषीत झाल्यानंतर शौचालय वापराबाबत जनजागृतीवर भर देण्यात आला. मात्र, कोरोना संकटानंतर ग्रामीण भागात शौचालय वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. याकाळात शौचालयाची मागणी झाली असून, ते उद्दृष्टये मार्च २०२३ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे."- वर्षा फडोळ, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता, जि.प.

World Toilet Day
Nashik : द्राक्ष निर्यात यंदा 10 हजार कोटींपर्यंत शक्य; निर्यातीसाठी हवी सवलत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com