येसगाव- महागाईच्या जमान्यात सद्यःस्थितीत पहिलवान होणे सर्वसाधारण तरुणांच्या आवाक्याबाहेर आहे. पहिलवान होण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती चांगली असणे गरजेचे आहे. आस्था, सुदृढ शरीर यष्टी या बाबीदेखील महत्त्वाच्या आहेत. वाढत्या महागाईचा परिणाम कुस्तीगिरांवर झाला आहे.