नाशिकला सराव करणाऱ्या यमुनाने पटकावले कांस्‍य | Athletics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yamuna Ladkat

नाशिकला सराव करणाऱ्या यमुनाने पटकावले कांस्‍य

नाशिक : केरळ (Kerala) येथील कालिकत येथे सुरू असलेल्‍या पंचविसाव्या राष्ट्रीय फेडरेशन (Federation cup) कप वरिष्ठ गट ॲथलेटिक्‍स (Athletics) स्‍पर्धेच्‍या शेवटच्‍या दिवशी नाशिकला सराव करणाऱ्या यमुना लडकत हिने कांस्‍य पदकाची (Bronze Medal) कमाई केली. आठशे मीटर महिलांच्‍या गटातून धावताना तिने महाराष्ट्राला पदक जिंकून दिले आहे.

या स्‍पर्धेत यापूर्वी पहिल्‍याच दिवशी नाशिकच्‍या संजीवनी जाधव (Sanjeevani Jadhav) हिने दहा हजार मीटर गटातून सुवर्णपदकाची (Gold Medal) कमाई केली होती. त्‍यानंतर सोमवारी (ता. ४) कोमल जगदाळे हिने तीन हजार मीटर स्‍टेपलचेस (Staplechase) या गटातून अव्वल क्रमांक पटकावताना सुवर्णपदक मिळवून दिले होते. नाशिकच्‍या या दोघा धावपटूंनी महाराष्ट्राच्‍या खात्‍यात पदक जिंकून दिले होते. मंगळवारी (ता. ५) स्‍पर्धेच्‍या समारोपाच्‍या दिवशी नाशिकला सराव करणाऱ्या यमुना लडकत हिने महिलांच्‍या आठशे मीटर गटातून धावताना दोन मिनिटे ०३.२३ सेकंदांची वेळ नोंदविताना तृतीय क्रमांकासह स्‍पर्धा पूर्ण केली. यामुळे तिला कांस्‍यपदकावर समाधान मानावे लागले. या गटातून दिल्‍लीच्‍या चंदा हिने दोन मिनिटे ०२.११ सेकंद वेळ नोंदविताना सुवर्णपदक पटकावले. तर पश्‍चिम बंगालच्‍या लिली दास हिने दोन मिनिटे ०३.२३ सेकंद वेळ नोंदविताना द्वितीय क्रमांकासह रौप्‍यपदक (Silver Medal) जिंकले.

हेही वाचा: IPL 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या आगमनाने चुरस वाढणार

आशियायी स्‍पर्धेसाठी कोमल पात्र

दरम्‍या,न या स्‍पर्धेत सुवर्णपदक विजेती कोमल जगदाळे ही कामगिरीच्‍या जोरावर आशियायी स्पर्धेकरिता (Asian Championship) पात्र ठरली आहे. या वर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात चीन (China) येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील स्‍पर्धेत कोमल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

हेही वाचा: Sports Bra खरेदी करताय! या ११ गोष्टी ठेवा लक्षात

Web Title: Yamuna Practicing In Nashik Won Bronze At Kerala Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top