नाशिक- नगरपालिका काळापासून अस्तित्वात असलेल्या रविवार कारंजा येथील यशवंत मंडई धोकादायक स्थितीत असल्याने लवकरात जमीनदोस्त होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबविली आहे..रविवार कारंजा येथे नगरपालिका काळामध्ये व्यापार- वृद्धीसाठी यशवंत मंडई उभारण्यात आली. जुन्या नाशिकचे आयकॉन म्हणून मंडईचा नावलौकिक झाला. मात्र शहर जसे वाढत गेले, त्याप्रमाणे व्यावसायिक इमारती उभ्या होत गेल्या. कालांतराने यशवंत मंडईचे महत्त्व कमी झाले. मात्र शहराच्या मध्यवर्ती जागा असल्याने व रविवार पेठेतील वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर झाल्याने त्या जागेवर वाहनतळ उभारावे, अशी मागणी माजी नगरसेविका स्वर्गीय सुरेखाताई भोसले यांनी केली होती. त्या संदर्भात स्मार्टसिटी कंपनीकडे प्रस्तावदेखील सादर केला होता..स्मार्टसिटी कंपनीच्या ५२ प्रकल्पांमध्ये यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र स्मार्टसिटी कंपनीकडून कालांतराने सदरचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. मंडईचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर इमारत कालबाह्य ठरत असल्याने धोकादायक स्थितीत आली आहे. असा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला. त्यामुळे महापालिकेने मंडई खाली करण्याच्या नोटिसा येथील भाडेकरूंना दिल्या. .Trimbakeshwar Development Project: त्र्यंबकेश्वर विकासासाठी २७५ कोटींची मान्यता.मात्र, काही भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेत भाडेकरूंना नवीन प्रस्तावित इमारतीमध्ये जागा द्यावी, अशी मागणी केली. महापालिकेने मात्र इमारत धोकादायक स्थितीत असल्याने पाडकाम आवश्यक असल्याचे न्यायालयात नमूद केले. न्यायालयानेदेखील याचिकाकर्त्यांना त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करावे, अशा सूचना दिल्या. त्रयस्थ संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर त्या संस्थेनेदेखील धोकादायक स्थितीत इमारत असल्याचा अहवाल दिला. सदर भाडेकरूंनी इमारत खाली केल्यानंतर आता महापालिकेने पाडकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने निविदा प्रसिद्ध केली आहे. एजन्सी नियुक्त झाल्यानंतर लवकरच यशवंत मंडई जमीनदोस्त होणार आहे..बहुमजली वाहनतळाची मागणी यशवंत मंडई जमीन दोस्त झाल्यानंतर सदरच्या जागेवर वाहन तळ उभारावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे. रविवार कारंजा हा भाग गावठाणात येतो. गावठाणात अद्याप क्लस्टर जाहीर झालेले नाही. एफएसआयदेखील पुरेशा प्रमाणात नाही. मंडईच्या जागेवर पार्किंग उभारणे गरजेचे आहे. शहराची गरज लक्षात घेऊन वाहनतळ उभारावे अशी मागणी स्व. सुरेखाताई भोसले प्रतिष्ठानचे सचिन भोसले यांनी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.