Yashwantrao Chavan Open University
sakal
नाशिक: संगणक अवगत झाल्यावरही रोजगाराच्या संधी हिरावल्या जातील, अशी भीती व्यक्त होत होती. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आल्यानंतरही हीच भीती युवा वर्गामध्ये आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजगार संधी वाढल्याचा पूर्वेतिहास आहे. त्यामुळे युवकांनी भीती न बाळगता तंत्रज्ञानाशी एकरूप होत वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असा सल्ला केंद्र सरकारच्या ‘एनसीव्हीईटी’चे माजी अध्यक्ष डॉ. निर्मूलजितसिंह कलसी यांनी केले.