YCMOU प्रवेशाची 30 पर्यंत मुदत

YCMOU Latest marathi news
YCMOU Latest marathi newsesakal

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश दिले जात आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना दूरस्‍थ शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार आता राज्‍यभरातील विद्यार्थी ३० सप्‍टेंबरपर्यंत विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावरुन ऑनलाइन अर्ज भरू शकतील. (YCMOU admission deadline till 30 Nashik Latest Marathi News)

YCMOU Latest marathi news
NMC News : भूसंपादनाचा मोबदला निश्चित करताना अभियंते जबाबदार

बी.एड., कृषी अभ्यासक्रमासाठी ही वाढीव मुदत ग्राह्य धरली जाणार नसल्‍याचे विद्यापीठाने स्‍पष्ट केलेले आहे. गेल्‍या ६ जुलैपासून विद्यापीठातर्फे ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. ३१ ऑगस्‍टपर्यंत मुदत असताना दोन वेळा मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत विना विलंब शुल्‍क प्रवेश अर्ज करता येईल.

तसेच प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्‍यतेची मुदत ५ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असणार आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरल्‍यानंतर निवड केलेल्‍या अभ्यासकेंद्राशी संपर्क साधत प्रवेशास मान्‍यता घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्‍या नोंदणी कक्षातर्फे केले आहे. आत्तापर्यंतच्‍या प्रवेश प्रक्रियेला राज्‍यभरातून प्रतिसाद मिळतो आहे. सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना, विविध वर्षांकरिता प्रवेश अर्ज दाखल केलेला आहे. वाढीव मुदतीत आणखी काही अर्ज दाखल होण्याची शक्‍यता आहे.

YCMOU Latest marathi news
17 माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; तिदमे यांनी प्रवेश करताच महानगरप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com